महाराष्ट्र

maharashtra

Barsu Refinery Project Profile : स्थानिकांच्या आंदोलनामुळे बारसू चर्चेत; वाचा, काय आहे रिफायनरी प्रोजेक्ट

By

Published : Apr 28, 2023, 5:22 PM IST

Updated : Apr 28, 2023, 5:37 PM IST

बारसू रिफायनरी प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात बारसू रिफायनरी उभारली जात आहे. पण त्याला स्थानिक लोकांचा विरोध आहे.

Barsu Refinery Project
बारसू रिफायनरी प्रकल्प

मुंबई :कोकणात राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या रद्द झालेल्या अधिसूचनेनंतर आता बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग कंपनी प्रस्तावित आहे. हा प्रकल्प खुप मोठा असून हा तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे. हा एक महाराष्ट्र शासनाचा आगळावेगळा उपक्रम आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे राजापूर तालुक्यातील बारसू आणि इतर गावांच्या परिसरात नियोजित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणारी मोठी कंपनी आहे. केंद्र शासनाचा या आरामको कंपनीबरोबर उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन आणि इंडियन ऑइल या तीन कंपन्यांच्या सहाय्याने हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे.

तेल शुद्धीकरण करणारा मोठा प्रकल्प :तेल शुद्धीकरण क्षेत्रातील आरामको सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणारी करणारी मोठी कंपनी आहे. हा रिफायनरी प्रकल्प बारसू आणि इतर गावांच्या परिसरात सुमारे १३ हजार एकर जागेवरती प्रस्तावित आहे. थोडक्यात तेल शुद्धीकरण करणारा हा मोठा प्रकल्प आहे. पेट्रोलियम व पेट्रोलियम उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याचा ताण सध्याच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर येत आहे.

प्रकल्पाला गावकऱ्यांचा आणि विरोधकांचा कडाडून विरोध : बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग कंपनी प्रस्तावित आहे. विरोधकांचे आणि गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना त्यांच्या जमीनी प्रकल्पासाठी द्यायच्या नाहीये. तसेच त्यांना त्यांच्या गावाचा विनाश होताना पाहावल्या जाणार नाहीये. सोमवारपासून बारसू सोलगाव या रिफायनरीसाठी मातीचे परीक्षण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पाला गावकऱ्यांचा आणि विरोधकांनी कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही सरकार माती परीक्षण करण्यावर ठाम आहे. आंदोलकांनी विरोध करु नये, अशी विनंती सरकारच्या वतीने केली आहे. दुसरीकडे हा प्रकल्प शेतकऱ्यांना मान्य नसून शेतकरीदेखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

CM on Barsu Refinery : बारसूत शांतात असून, लाठीचार्ज झाला नाही - मुख्यमंत्री

Last Updated : Apr 28, 2023, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details