महाराष्ट्र

maharashtra

Tunisha Sharma mother allegation : इस्लाम स्वीकारण्यासाठी शिझानकडून दबाव; तुनिषाच्या आईचा आरोप

By

Published : Dec 30, 2022, 11:34 AM IST

Updated : Jan 1, 2023, 4:24 PM IST

तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिझानने तुनिषासोबत जवळीक ( Tunisha Sharma mother allegation on Sheezan Khans ) वाढवली. तिचा फायदा घेतला आणि नंतर तिचा विश्वासघात केला असे त्यांनी म्हटले आहे. इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणयचा. त्याशिवाय तो ड्रग्स घ्यायचा असे तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषदेत ( Sheezan Khans drug addiction and Islam conversion ) म्हटले आहे.

Tunisha Sharma mother allegation
तुनिषा शर्माच्या आईची पत्रकार परिषद

वनिता शर्मा माध्यमांसोबत बोलताना

मुंबई :तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषद (Tunisha Sharma Mother Press conference ) घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी शिझानवर गंभीर आरोप केले ( Tunisha Sharma mother allegation on Sheezan Khans ) आहेत. त्याने ब्रेकअपच्या वेळी तिला मारहाण केली. असभ्य भाषेचा वापर केला. रिलेशनशीपमध्ये असताना तिचा फायदा घेतला. असे गंभीर आरोप तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषदेतून केले आहेत.

तुनिषाचा फायदा घेतला : मालिकेच्या सेटवर आधी तिच्याशी जवळीक वाढवली. तिचा विश्वास कमावला. शिझानने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. महागड्या भेटवस्तू तुनिषाने ( Sheezan Khan Took Tunisha Sharma Advantage ) दिल्या. मला आवडत नसलेल्या गोष्टी केल्या, जसे की टॅटू काढणे, घरात कुत्रा पाळणे तरीही त्यांनी ते केलं. कारण शिझान आणि त्याच्या कुटूंबाने तुनिषाला हिप्नोटाईज केल्या सारखं केल होतं. ती माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. त्यांच्या गोष्टींना प्राधान्य देत होती. सगळ मिळाल्यावर तिच्याशी ब्रेकअप केले. ब्रेकअपच्या वेळी तिला कानाखाली मारली होती. तेव्हा ती खूप रडली. तिला खूप त्रास झाला. शिझानचे आधीच दुसऱ्या मुलीसोबत रिलेशन होते. असे असतानाही त्याने तुनिषासोबत नाते का बनवले. माझी गाडी तो वापरायचा. त्याने वापर केलेल्या गाड्यांचे आणि ड्रायव्हरचे 50 हजारांचे मी बील भरले आहे.

हत्येचा संशय :गळफास घेतल्यावर मला सेटवरू फोन आला. मी लगेच रिक्षा करून आले. तिला फासावरून उतरवल्यावर लगेच रूग्णवाहिका बोलावली नव्हती. रूग्णवाहिकेला का बोलावले नाही. 15 मिनिटांनी रूग्णवाहिका आली होती. इतका वेळ का लागला. यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तुनिषाच्या हत्येसंबंधीत शिझानच्या कुटूंबावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे तुनिषाच्या आईने म्हटले ( Tunisha murder Suspect ) आहे.

सुशांत सिंगप्रमाणे ड्रग्सचे अ‍ॅडिक्शन : शिझान इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी तुनिषावर दबाव आणायचा असे तिच्या आईने म्हटले आहे. त्याशिवाय सेटवर तो नशापाणी करायचा असेही त्यांनी म्हटले ( Drug Addiction Like Sushant Singh Rajput ) आहे. मृत्यूच्या दोन दिवस आधी तुनिषा खूप तणावात दिसत होती. जेव्हा मी सेटवर गेली तेव्हा तुनिषाने मला शिझानसोबत बोलायला सांगितले. तशी मी देखील शिझानच्या रूममध्ये बोलण्यासाठी गेली. मात्र शिझानच वागण वेगळ होतं. मी काहीच करू शकत नाही या प्रकरणात असे शिझान म्हणाला. त्यापुढे शिझान माझ्यासोबत काहीच बोलला नाही. असे तुनिषाच्या आईने सांगितले.

Last Updated : Jan 1, 2023, 4:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details