महाराष्ट्र

maharashtra

Sudhir Mungantiwar : ...तर त्यांना चोप द्यायलाच पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांचा कर्नाटकला सज्जड दम

By

Published : Dec 7, 2022, 9:56 AM IST

कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association ) केलेल्या राड्यानंतर मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी आक्रमकपणे पवित्रा घेतला आहे. बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड ( Maharashtra vehicles vandalized in Belgaum ) करण्यात आल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Sudhir Mungantiwar
मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड ( Maharashtra vehicles vandalized in Belgaum ) करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association ) केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटक सरकारच्या आडमुठे धोरणावर महाराष्ट्र सरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीका ठाकरे गटाकडून होत असताना दुसरीकडे आता भाजप नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ( BJP leader Forest Minister Sudhir Mungantiwar ) यांनीसुद्धा या प्रकरणावरून कर्नाटक सरकारला सज्जड इशारा दिला आहे. मुंबईत ते बोलत होते.


कर्नाटक सरकारला महाराष्ट्र सरकारच्यावतीने हा इशारा :या विषयावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, बेळगावमध्ये असे समाजकंटक जर घातपात करत असतील तर महाराष्ट्रातील सरकारच्यावतीने याची गंभीर दखल कर्नाटक सरकारला घ्यावीच लागेल, असा महाराष्ट्र सरकारचा आग्रह असेल. एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पनेतून देशात महाराष्ट्र राज्य इतर राज्यातील लोकांच्या इतर भाषिकांचा सन्मान करण्यात अग्रेसर राहिला आहे. पण हे असताना जर कोणी आमच्या वाटेला जाणार असेल तर त्यांना वाटेला लावण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमच्याकडे ताकद आहे, शक्ती आहे व छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा सुद्धा आहे. कर्नाटक सरकारला महाराष्ट्र सरकारच्यावतीने हा इशाराही देण्यात येईल की जे समाजकंटक आहेत, जे गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, जे नादान आहेत, जे मराठी भाषिक असणाऱ्या बेळगावमध्ये दुष्ट प्रवृत्ती अशा पद्धतीची कृत्य करत असतील तर त्यांना चोप द्यायलाच पाहिजे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार

ABOUT THE AUTHOR

...view details