महाराष्ट्र

maharashtra

स्ट्रीट फूड खाताय.. मुंबईत इडली तयार करण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Jun 1, 2019, 4:39 PM IST

Updated : Jun 1, 2019, 5:04 PM IST

कुर्ला स्थानकातील अस्वच्छ लिंबू सरबत विक्रीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका गलिच्छ इडलीवाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

गलिच्छ पाणी घेताना

मुंबई - जर तुम्ही रस्त्यावर विक्री करण्यात येणारे खाद्यपदार्थ खात असाल, तर सावधान. ते तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. कारण, असे रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांचे एक एक गलिच्छ प्रकार समोर येत आहेत. कुर्ला स्थानकातील अस्वच्छ लिंबू सरबत विक्रीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका गलिच्छ इडलीवाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडिओ

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इडलीवडा विक्रेत्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत विक्रेता इडली वड्याच्या चटणीत टाकण्यासाठी आणि ग्राहकांना पिण्यासाठी लागणारे पाणी जवळील शौचालयातील नळाचे भरत होता. इडली विकत असताना शेजारील रेल्वेस्थानकाच्या जवळ असणाऱ्या शौचालयाचे पाणी वापरतानाचा हा व्हिडिओ कोणी एका जागरुक ग्राहकाने कॅमेऱयात कैद केला आहे. त्याला संबंधित व्हिडिओतील ग्राहकाने जाब विचारला असता त्याने ते पाणी फेकून दिले.

अशा प्रकारे हजारो विक्रेते रस्त्यावर ठेले टाकून विविध पदार्थ विकतात. अन् लोकही हे पदार्थ चवीने खातात. परंतु, ते बनविण्याची प्रक्रिया, ते कसले पाणी वापरतात, कसल्या जागेत बनवतात. यावर कोणीही लक्ष देत नाही. प्रशासनही अशा विक्रेत्यांवर तात्पुरती कारवाई करते. यावर आता तरी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी लोकांमधून होत आहे.

मध्य रेल्वेने अस्वच्छ लिंबू सरबत विक्री प्रकरणाची चौकशी केल्यावर स्थानकातील सर्व उघड्यावर शीतपेयांतची विक्री करणाऱ्या पेयांवर बंदी आणली होती. आता उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करून जीवाशी खेळ खेळणाऱ्या या विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासन काय कारवाई करेल, असा प्रश्न उपस्थित केला जातो.

Last Updated : Jun 1, 2019, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details