मुंबई : खार परिसरात ३० नोव्हेंबर रोजी एका महिलेचा विनयभंग (Woman molested) केल्याप्रकरणी शहजादे शेख नावाच्या डिलिव्हरी बॉयला अटक (delivery boy arrested) करण्यात आली होती. पार्सल देताना आरोपी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड (video recording of woman by delivery boy) करत होता. महिलेने विरोध केला असता आरोपीने पीडितेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न (delivery boy trying to enter womans house) केला आणि तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime,
डिलेव्हरी बॉयला अटक : खारमध्ये एका दक्षिण कोरियाच्या महिलेचा लैंगिक छळ झाल्याच्या दोन दिवसांनंतर, अशीच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका महिलेचा झेप्टोच्या डिलेव्हरी करणार्या व्यक्तीने तिच्या राहत्या घरी विनयभंग केला. 30 नोव्हेंबर, बुधवारी तिच्या खार पश्चिम येथील राहत्या घरी ही घटना घडली. आरोपी शहजादे शेखला पोलिसांनी अटक केली.
सुरक्षा रक्षकाने महिलेला वाचविले :सबीना नावाच्या महिलेने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर हा त्रास सांगितला केला. तिने आरोप केला आहे की, शहजादे शेख नावाच्या डिलिव्हरी बॉयने पार्सल देताना प्रथम तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिला धक्काबुक्की करून तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि बेदम मारहाण केली. सबीनाने दावा केला की, तिला तिच्या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने स्वयंपाकघरातून मदतीसाठी हाक मारल्याने तिला वाचवले.
पीडितेने मांडली इन्टाग्रामवर व्यथा :"मला खूप भयंकर वाटले आणि मी त्वरीत माझ्या स्वयंपाकघरात धावत माझ्या सिक्युरिटीला किचनच्या खिडकीतून हाक दिली आणि सिक्युरिटी आल्यावरही डिलिव्हरी करणारा माणूस ऐकत नाही तो माझ्याकडे येत होते. शेवटी माझ्या सिक्युरिटीने त्याला थांबवले आणि त्याचा फोन घेतला आणि त्याला दिला. मी, त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मी पाहिला. हे माझ्यासोबत अजिबात ठीक झालेले नाही,” असे पीडितेने केलेल्या तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
डिलिव्हरी कंपनी झेप्टोचे निवेदन जारी :तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी वांद्रे न्यायालयात हजर केले जाईल. या घटनेची दखल घेत, डिलिव्हरी कंपनी झेप्टोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "आम्ही अशा बाबी अत्यंत गांभीर्याने घेतो. आम्ही स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. आम्ही अशा वर्तनाचा निषेध करतो. कठोर कारवाई केली जाईल. तथ्यांच्या आधारे गुन्हेगारांवर कारवाई केली जाते."