महाराष्ट्र

maharashtra

Tunisha Sharma Case : रामदास आठवले यांनी तुनिषा शर्माच्या कुटुंबियांची घेतली भेट

By

Published : Dec 29, 2022, 1:14 PM IST

Updated : Dec 29, 2022, 4:08 PM IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale Tunisha Sharma ) यांनी मुंबईत दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माच्या कुटुंबियांची ( family members of deceased actor Tunisha Sharma ) भेट घेतली आहे.

रामदास आठवले यांनी तुनिषा शर्माच्या कुटुंबियांची घेतली भेट
Tunisha Sharma Case

रामदास आठवले यांनी तुनिषा शर्माच्या कुटुंबियांची घेतली भेट

मुंबई :केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale Tunisha Sharma ) यांनी मुंबईत दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माच्या कुटुंबियांची ( family members of deceased actor Tunisha Sharma ) भेट घेतली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale on Tunisha Sharma suicide ) म्हणाले, की आम्ही तुनिषाच्या आईला भेटलो. आरोपी शीझान खानला कठोर शिक्षेची त्यांनी मागणी केली. मी ते पूर्ण होईल याची खात्री दिली. मी उपमुख्यमंत्र्यांना भेटेन. त्याने (शीझान) तिचा विश्वासघात केला आणि त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फाशी द्या, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

आत्महत्येचा प्रयत्न :24 डिसेंबर रोजी एका टीव्ही शूटच्या सेटवर वॉशरुममध्ये मृतावस्थेत सापडल्याच्या पंधरवड्यापूर्वी तुनिशा आणि शीझानचे ब्रेकअप झाले होते. चौकशीदरम्यान शीझानने पुढे खुलासा केला की, तुनिषाने याआधीही ब्रेकअप झाल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी मी तिला वाचवले. तुनिषाच्या आईला तिची विशेष काळजी घेण्यास सांगितले.

लग्नाची खोटी आशा :दरम्यान, तुनिषाची आई वनिता हिने आरोप केला आहे की, शीझानने तुनिषाला लग्नाची खोटी आशा दाखवून फसवणूक केली आहे. शीझान तुनिशासोबत रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवला होता. त्याने तीन ते चार महिने तिचा वापर केला आणि नंतर तिच्याशी संबंध तोडले,असे तिने सोमवारी प्रसिद्ध झालेल्या माध्यमांना उद्देशून केलेल्या व्हिडिओमध्ये आरोप (Tunisha Sharmas mother on Sheezan) केले.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा :वनिताने पुढे शीझानवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला सोडता कामा नये. मी माझे मूल गमावले आहे, असे अस्वस्थ झालेल्या आईने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तिचा सहकलाकार आणि माजी प्रियकर शीझान खान याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा करत तुनशियाच्या मृत्यूनंतर तिने वालीव पोलीसात तक्रार दाखल केली (Tunisha Sharma Murder Case) होती.

गुन्हा दाखल :वनिताच्या तक्रारीनंतर खानविरुद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी वालीव पोलिसांनी 'अली बाबा : दास्तान ए काबुल' या स्टारला अटक केली. वसई न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली(Tunisha Sharma Suicide) आहे.

चौकशीत या बाबी समोर :पोलिसांनी सांगितले की, शीझान आणि तुनिशा नेहमीप्रमाणे सेटवर एकत्र जेवणासाठी जाण्यापूर्वी मेकअप रूममध्ये भेटले होते. पण तुनिशाने त्यादिवशी जेवण केले नाही. दुपारच्या जेवणानंतर, शीझान कामात व्यस्त झाला तर तुनिशा वॉशरूममध्ये गेली आणि बराच वेळ परत न आल्याने संशय निर्माण झाला. काही वेळातच ती मृतावस्थेत आढळली.

Last Updated : Dec 29, 2022, 4:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details