मुंबई : मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. या दोन्ही ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाईल. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हा उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारी पार पडणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षानेदेखील संपूर्ण बॅनरबाजी केलेली पाहायला मिळत आहे.
प्रकल्पाचे लोकार्पण :या कार्यक्रमासोबतच सांताक्रुज चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास प्रकल्प या दोन प्रकल्पाचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. तसेच मुंबईतील अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनही करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईवर पोलीस बंदोबस्त देखील चोख करण्यात आला आहे. 20 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आले होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते काही विकास कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यामध्ये मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बीकेसीच्या मैदानावर झाली होती.
असा असणार पंतप्रधानांचा मुंबई दौरा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुपारी २.३० वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. तिथून थेट हेलिकॉप्टरने पंतप्रधान आयएनएस शिक्रा हेलिपॅडवर जातील. तीन वाजताच्या दरम्यान पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर पोहोचतील. ३.३० वाजताच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म नंबर 18 वर जातील. दुपारी चार वाजताच्या दरम्यान पंतप्रधान वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, त्याआधी वंदे भारत ट्रेन बाबत प्रेझेंटेशन दिले जाईल.
लहान मुलांबरोबर बातचीत : पंतप्रधान वंदे भारत ट्रेनमध्ये लहान मुलांबरोबर बातचीत करणार आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण होईल. जवळपास साडेचारच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होईल. त्यानंतर पंतप्रधान गाडीने आयएनएस शिक्रावर पोहोचतील. तेथून हेलिकॉप्टरने पंतप्रधान विमानतळावर जातील. विमानतळावरून गाडीने अंधेरी मरोळ येथे पंतप्रधान जाणार आहेत. मरोळला जवळपास ५.३० च्या दरम्यान ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसच उद्घाटन करतील. कार्यक्रमानंतर पुन्हा गाडीने पंतप्रधान मुंबई विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.
हेही वाचा : PM Modi Visit Mumbai : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा; वाहतुकीत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग