महाराष्ट्र

maharashtra

Nitesh Rane Allegation : नारायण राणेंना दोनवेळा मारण्याचा प्रयत्न; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 1:08 PM IST

Updated : Oct 12, 2023, 3:57 PM IST

Nitesh Rane Allegation : भाजपा आमदार नितेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना दोनदा मारण्याचा प्रयत्न केल्याचा हा आरोप आहे.

Nitesh Rane News
भाजपा आमदार नितेश राणे

मुंबई Nitesh Rane Allegation : नारायण राणेंना दोनवेळा मारण्याचा प्रयत्न झाला असून, असाच कट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात रचला गेल्याचा गंभीर आरोप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane Allegation on Uddhav Thackeray) केलाय. तसंच यासर्व प्रकरणात उद्धव ठाकरेंची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही नितेश राणेंनी केलीय. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) तेव्हा संरक्षण का दिलं नाही? या कटात उद्धव ठाकरेंचा किती हात आहे? यासाठी त्यांची सीबीआय चौकशी करावी. त्यांच्यात इतकी मस्ती होती तर त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यायला हवं होतं, अशी टीकाही आमदार नितेश राणेंनी केलीय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मारण्याचे पुरावे आमच्याकडे : एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाबत म्हटलं आहे ते खरं आहे. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा सुद्धा त्यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांच्याकडून केला गेला. याबाबत राणे हे देखील बोलले आहेत. तेव्हा कुठल्या गॅंगला सुपारी दिली गेली. कुठले इंजेक्शन देण्याचा प्रयत्न झाला याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांना मारण्याचा प्रयत्नही केला गेला. उद्धव ठाकरे यांना इतकी मस्ती होती तर त्यांनी गडचिरोलीच पालकमंत्री पद घ्यायला हवं होतं. मुख्यमंत्री असताना ते घरात बसून राहिले. या पूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे हिंदू द्वेशी : नवरात्रीमध्ये गरबा व दांडिया आयोजकांना विश्व हिंदू परिषद व नितेश राणे यांच्याकडून आव्हान केलं गेलं की, जे गरबा खेळण्यासाठी किंवा दर्शनासाठी येतील ते हिंदूच असले पाहिजेत. म्हणून त्यांचं आयडी तपासा. यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून नितेश राणे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. याचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, जे हिंदू द्वेशी आहेत ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वात जास्त हिंदू सणावर बंदी आणली. औरंगजेब विरोधात ते कधी बोलले नाहीत. सनातन धर्माची बाजू त्यांनी कधी लावून धरली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सतत टीका करण्याचं काम ते करत आहेत. आम्हाला शिव्या शाप देणारे हे चायनीज मॉडेल हे हिंदुत्त्ववादी आहेत. हमास सारखी परिस्थिती काँग्रेस इथे घडवत आहे. ओवेसीच्या दोन्ही भावांचं थोबाड बंद करण्याची हिंमत यांच्यात नाही. जो हिंदू समाजाच्या हिताचं बोलत असेल तर यांना मिरच्या झोंबतात. राम जन्मभूमीच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम संजय राऊत करत आहेत. असा टोलाही नितेश राणे यांनी राऊत यांना लगावला आहे.

सुप्रिया ताईंनी कधीतरी हिंदूंची बाजू घ्यावी : नवरात्रीमध्ये आयडी तपासून प्रवेश द्यावा, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, आम्ही हिंदूंची बाजू घेतली, तेव्हा अन्य धर्माच्या बद्दल सुप्रिया सुळे या सल्ले का देत नाहीत. सगळेच सल्ले हिंदू समाजाला का? मोहरमच्या जुलूसमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. त्यावर सुळे का बोलत नाहीत? हिंदू समाजावर एवढा द्वेश का आहे? मोहरमच्या वेळेस सुळे या सल्ले देताना का दिसत नाहीत? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.

गुजराती समाजाबद्दल काँग्रेसची भूमिका : म्हारु गुजरातवरून सध्या वाद सुरू आहे. यावर नितेश राणे म्हणाले आहेत की, व्हायब्रंट लंडन करायचं असेल तेव्हा तुम्हाला गुजराती चालतात. तुमच्या लंडनच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये दोन गुजराती डेव्हलपर तुम्ही घेऊन जाता. तुमचा सर्व खर्च ते करत असतात. या निमित्ताने म्हारू गुजरातवर किंवा व्हायब्रंट गुजरातवर टीका होती. तर मला काँग्रेसच्या नेत्यांना विचारायचं आहे त्यांची याबाबत भूमिका काय आहे? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचं ते समर्थन करतात का? काँग्रेसलाही गुजराती समाजाचे लोक मतदान करतात त्यांना ठाकरेंची भूमिका मान्य आहे का? काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं असंही नितेश राणे यांनी म्हंटलं आहे.

हेही वाचा -

  1. Narayan Rane On Reservation: कोणताच मराठा 'कुणबी' प्रमाणपत्र घेणार नाही - नारायण राणे
  2. Watch Video : 'मोदी पर उंगली उठाई, तो औकात दिखा दूंगा', अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान खासदारांमध्ये जुंपली
  3. Narayan Rane Targets Uddhav Thackeray : संजय राऊत मातोश्रीत पगारदार नोकर, उद्धव ठाकरेंना काही कळत नाही; नारायण राणेंचा प्रहार
Last Updated : Oct 12, 2023, 3:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details