महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole : धीरेंद्र शास्त्रींबद्दल नाना पटोलेंनी केली 'ही' मागणी

By

Published : Mar 16, 2023, 5:49 PM IST

Updated : Mar 16, 2023, 6:16 PM IST

महाराष्ट्र सरकार सीमा भागात ज्या योजना राबवत आहे त्या योजना आम्ही राबवू देणार नाहीत, असे मोठे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नावर राजकीय वातावरण तापले आहे. बोम्मई यांच्या या वक्तव्याने भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. विधान भवनात ते बोलत होते. तसेच धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.

NANA PATOLE ON KARNATAK
नाना पटोले

मुंबई :कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमा भागा बाबत जी भूमिका घेतली आहे त्यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. भाजप ही एक जूमलेबाज पार्टी असून वारंवार ते जनतेच्या विरोधातच भूमिका बजावत असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले आहे. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा भागात राज्य सरकारने काही योजना आणल्या आहेत. त्याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे. राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे. कर्नाटक मध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार असताना अशा पद्धतीने सीमा भागातील लोकांवर अन्याय होत असेल तर त्यांनी कोणाच्या आशेवर जगायचे, असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

कार्यक्रमाला परवानगी देऊ नका -बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा वसई-विरार येथे दिनांक १८ व १९ मार्च २०२३ रोजी एक कार्यक्रम होत असल्याची माहिती आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणारे विधान करुन लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी देऊ नये अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे, अंधश्रद्धेला आपल्या राज्यात अजिबात थारा नाही, महाराष्ट्राने तसा कायदाही केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या वसई-विरार येथील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास जनतेची दिशाभूल करून त्यांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळ मांडला जाऊ शकतो, असेही पटोले म्हणाले.



जागा वाटपावरून अद्याप चर्चा नाही :राज्यात महाविकास आघाडी सरकारने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. जे भाजपच्या विरोधात येतील त्यांना एकत्र घेऊन निवडणूक लढू. राज्यात लोकसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या या बाबत काँग्रेस आढावा घेईल व त्या नुसार जागा ठरवल्या जातील. परंतु अद्याप यावर काही चर्चा नाही आहे. जागा वाटपावरून ज्या काही बातम्या येत आहेत. यात काहीच तथ्य नसल्याचे सुद्धा नाना पटोले यांनी सांगितल आहे.



स्वतःचे खिसे भरणारे सरकार? :राज्यात भरती प्रक्रियेसाठी आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यावर बोलताना नाना म्हणाले की, जुमलेबाजांकडून काय अपेक्षा करू शकतो. स्वतःचे इमले भरायचे, स्वतःच भ्रष्टाचार करायचा. स्वतःचे खिसे भरण्याचे काम भाजप करत आहे. त्याला आमचा विरोध आहे. हे सरकार कर्मचारी विरोधी आहे, असेही नाना म्हणाले.

हेही वाचा :Amruta Fadnavis News : अमृता फडणवीस यांना १ कोटींची ऑफर देणाऱ्या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

Last Updated : Mar 16, 2023, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details