महाराष्ट्र

maharashtra

mumbai rain : मान्सूनच्या पावसाची सुरुवात होताच थिरकले मुंबईकर, कुठे खेळला गरबा तर कुठे तुंबईमुळे नागरिकांची तारांबळ

By

Published : Jun 25, 2023, 11:51 AM IST

आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने मान्सूनच्या पहिल्या रविवारी पावसाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये अनेक मुंबईकरांनी विविध प्रकाराद्वारे या पावसाचा आनंद घेतला.

मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद
मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद

मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद

मुंबई : मुंबईत पावसाचे आगमन झाले असून कालपासून पावसाने जोर धरला आहे. आजही मुंबईमध्ये पावसाची संततदार सुरू आहे. मुंबईत नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याने पाऊस जोर धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सूनच्या पावसाचा आनंद मुंबईकरांनी घेतला आहे. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने मान्सूनच्या पहिल्या रविवारी पावसाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. इतके दिवस उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आज रविवारची पहाट अनोखी होती. हवेमध्ये असलेला गारवा आणि रिमझिम पडणाऱ्या पावसाचा मुंबईकरांना मनसोक्त आनंद घेतला. परंतु काही ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

गर्दीने फुलून मरीन ड्राईव्ह गेला : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या आगमनाने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यातच जून महिन्याचा शेवटचा रविवार आणि या रविवारची पहाट मरीन ड्राईव्हवर घालवण्यासाठी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विशेष करून मरीन ड्राईव्हचा संपूर्ण परिसर हा मुंबईकरांच्या गर्दीने फुलून गेला होता. त्याचबरोबर मुंबई बाहेरून आलेले पर्यटक सुद्धा येथे पावसाचा आनंद घेताना दिसून आले. विशेष म्हणजे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये अनेक मुंबईकरांनी विविध प्रकाराद्वारे या पावसाचा आनंद घेतला. काहीजण व्यायाम करताना दिसून आले काहीजण वॉक करत होते. तर काहीजण योगा करताना दिसून आले. तर काहीजण या आनंदी वातावरणात मरीन ड्राइवच्या किनाऱ्यावर फोटोसेशन करताना दिसून आले.

गाण्याच्या तालावर नाचले नागरीक : आज सुट्टीच्या दिवशी मान्सूनच्या पहिल्या रविवारी मरीन ड्राइवर ड्राइव्हवर अनेकजण गरब्याच्या तालावर नाचताना दिसून आले. यामध्ये सर्वच वर्गातील लोकांनी सहभाग घेतला होता. हवामान खात्याकडून मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. परंतु मुंबईत आज कितीही पाऊस बरसला तरी सुद्धा त्या पावसाचा मनमुराद आनंद घेण्याचे मुंबईकरांनी ठरवले असून त्यासाठीच त्यांनी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली होती. मुंबईमध्ये पहिल्या पावसाचा आनंद फारच वेगळा असतो. त्यातच मरीन ड्राईव्हसारखा परिसर असेल तर, "सोने पे सुहागा" असे मुंबईकरांनी सांगितलं आहे.

पहिल्या पावसात मुंबई तुंबली : काल झालेल्या पावसाने मुंबईतील अनेक भागात विशेष करून सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईचा पर्दाफाश झाला आहे. मुंबईतील किंग सर्कल मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले. अंधेरी मधील मोगरा नालाही भरून वाहू लागला. त्या कारणाने अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरले त्याचा फटका वाहतुकीला बसला. अनेक ठिकाणी रस्त्यात वाहने बंद पडल्याचे दिसून आले. याचबरोबर पहिल्या पावसात मुंबईतील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने अनेक दुर्घटनाही घडल्या. पाणी साजलेल्या परिसराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करत आहे.

आज मी येथे मिलान सबवे येथे आहे. काल येथे 1 तासात सुमारे 70 मिमी पाऊस पडला परंतु येथे पाण्याची साठवण टाकी बांधण्यात आल्याने वाहतूक थांबलेली नाही. येथे फ्लडगेटही बसविण्यात आले आहे. पावसाळ्यात लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मी विभागाला निर्देश दिले आहेत- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा -

  1. Maharashtra Monsoon update : मुंबईसह राज्यात पावसाची दमदार हजेरी, मुंबईतील गोवंडी परिसरात दोघांचा मृत्यू
  2. Heat Stroke In Maharashtra : पाऊस लांबला; उष्माघाताने अडीच हजार नागरिक बाधित, आतापर्यंत राज्यात 12 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details