मुंबई:आयएमडीने महाराष्ट्र येथे पावसाचा इशारा दिला आहे. वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे त्याचा परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहे. यंदा ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आधीच हैराण झालेल्या शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने, शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
अनेक भागात यलो अलर्ट: राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांसाठी सुद्धा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत सुद्धा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची काळजी घेणे फार महत्त्वाचे झाले आहे. शेती पिकांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता?: विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तणात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, व कोल्हापूर याशहरात ६ एप्रिल (गुरुवार) रोजी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली इथे पाऊस पडण्याची शक्यता असून, विदर्भातही अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सात एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तर पुढील ५ दिवस तीव्र हवामानाचा अंदाज अपेक्षित असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून देण्यात आली आहे.
याठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्याता: तर पुढील 24 तासांमध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, आसाम व नागालँड येथे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल. तसेतच अरुणाचल प्रदेश , सिक्कीम या ठिकाणी पर्वतीय पट्ट्यांमध्ये हलक्या स्वरुपातील बर्फवृष्टी होण्याची शक्याता आहे. तर इतर पूर्वोत्तर भारतात, केरळ, तामिळनाडूच्या काही भागांत हलक्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आलीआहे.
हेही वाचा: Video बुलढाण्यात अवकाळी पावसाने हतबल करणारे नुकसान व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी