महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : अभिनेते सतीश कौशिक अनंतात विलीन

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Mar 9, 2023, 6:34 AM IST

Updated : Mar 9, 2023, 9:44 PM IST

21:43 March 09

अभिनेते सतीश कौशिक अनंतात विलीन

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशल अखेर अनंतात विलीन झाले आहेत. मुंबईतील अंधेरी वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलावंत, गायक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतीश कौशिक यांच्या अंधेरी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

19:40 March 09

अभिनेता सतिष कौशिक यांचे पार्थिव एअर अँब्युलन्सने मुंबईत दाखल

मुंबई - अभिनेता सतिष कौशिक यांचे पार्थिव मुंबईत पोहोचले आहे. एअर अँब्युलन्सने त्यांचे पार्थिक मुंबईत आणण्यात आले आहे. कौशिक यांच्या मृत्यूसंदर्भात काही शंका उपस्थित केल्या गेल्याने पोस्टमार्टेम करण्यात आले. तसेच यासंदर्भात चौकशीही करण्यात आल्याचे वृत्त आहे, त्यामुळे त्यांचा मृतदेह मुंबईत येण्यास उशीर झाला.

19:28 March 09

महाराष्ट्राला आर्थिक सामाजिक औद्योगिक नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प - रामदास आठवले

मुंबई - महाराष्ट्राला आर्थिक; सामाजिक अद्योगिक आणि कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

19:16 March 09

निरस, बेरंग बजेट मांडून महाराष्ट्राची दिशाभूल, अर्थसंकल्पात फक्त जुमलेबाजी - अंबादास दानवे

मुंबई - एकीकडे राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घातलेला असताना सत्ताधाऱ्यांनी निरस व बेरंग बजेट मांडून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अशा प्रकारची टीका बजेटवर केली आहे.

19:08 March 09

नागालँडमध्ये ठरले ते प्रत्येक ठिकाणी ठरेल, वेट अँड वॉच; उदयनराजेंचे मोठे वक्तव्य

सातारा - नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारबाबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठे आणि सूचक वक्तव्य केले आहे. नागालॅंडमध्ये जे ठरले ते उद्या प्रत्येक ठिकाणी ठरेल. वेट अँड वॉच, असे उदयनराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

17:17 March 09

सतिष कौशिक यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडमधील कलाकारांची गर्दी

मुंबई - अभिनेते सतिष कौशिक यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडमधील कलाकार दाखल होत आहेत. त्यामध्ये अन्नु मलीक, अर्जुन कपूर, अनुपम खेर, शिल्पा शेट्टी अशी मंडळी पोहोचली आहेत.

16:30 March 09

ठाण्यात राज ठाकरे यांच्या सभेत लाव रे तो व्हिडिओचा आवाज घुमणार

ठाणे - मनसे नेते राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा होत आहे. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या सभेत लाव रे तो व्हिडिओचा आवाज घुमणार आहे. यासाठी मंचावर मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांचा राज ठाकरे समाचार घेणार आहेत. राज ठाकरेंच्या रडारवर कोण हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

16:03 March 09

आजचा अर्थसंकल्प म्हणजे मधाचे बोट व गजरचा हलवा - उद्धव ठाकरे

मुंबई - अर्थसंकल्पावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर शेलकी टीका केली आहे. ते म्हणाले की, आजचा अर्थसंकल्प म्हणजे मधाचे बोट व गजरचा हलवा आहे.

15:57 March 09

राज्याचा पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित - फडणवीस

देशामध्ये अमृतकाळ सुरू असल्याचे पंतप्रधान सांगत असतात. त्यानुसारच अमृतकाळातील राज्याचा पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामध्ये 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, 5) पर्यावरणपूरक विकास या पाच तत्वांवर आधारित बजेट असेल असे फडणवीस यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते.

15:53 March 09

बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद

बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार यासाठी 1023 कोटी रुपये तरतूद. काजू बंडू प्रक्रिया केंद्र कोकणात स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये लागवडीपासून प्रक्रिया विक्रीपर्यंत योजना असतील. कोल्हापूर जिल्ह्यातील कोकण पट्टीतील तालुकांना यासाठी 1325 कोटी रुपये देणार आहेत अशी घोषणा बजेट भाषणामध्ये करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अपघातात मदतीचा हातही सरकार देत असते. त्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्याअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाईल असे ते म्हणाले.

15:46 March 09

जेवण बनविण्याच्या वादातून सहकारी कामगार मित्राची कारखान्यातच हत्या

ठाणे - जेवण बनविण्याच्या वादातून सहकारी कामगार मित्राची कारखान्यातच हत्या करण्यात आली. निजामपूरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला ठोकल्या पोलिसांनी बेड्या.

15:23 March 09

माऊलींनी सांगितल्याप्रमाणे जो जे वांछील तो ते लाहो असे हे बजेट - फडणवीस

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बजेट भाषण संपले. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वच जनतेला सर्वसमवेशक असे बजेट असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. माऊलींनी सांगितल्या प्रमाणे जो जे वांछील तो ते लाहो असे हे बजेट असल्याचे ते म्हणाले.

15:17 March 09

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या ठिकाणी मराठी भाषेचा आद्य ग्रंथ लीळाचरित्र लिहिण्यात आला. त्याच्या सन्मानार्थ येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. त्यासाठी भरीव तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे.

15:11 March 09

5 ज्योतिर्लिंग देवस्थान विकासाकरता 500 कोटी रुपयांची तरतूद

देशात प्रसिद्ध असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांच्यापैकी राज्यातील महत्वाच्या 5 ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विकासाकरता भरीव तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग देवस्थान विकासाकरता 500 कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली.

15:07 March 09

उद्यान तसेच जंगलवाढीसाठी रोपे पुरवण्यासाठी 50 हायटेक रोपवाटिका

उद्यान तसेच जंगलवाढीसाठी रोपे पुरवण्यासाठी 50 हायटेक रोपवाटिका तयार करण्यात येतील. त्यामध्ये प्रामुख्याने बेलासह इतर 5 वृक्षांच्या रोपांची निर्मिती करण्यात येईल.

15:04 March 09

मेट्रो उभारणीकरता 39 हजार कोटी रुपयांची तरतूद

राज्यात महत्वाच्या शहरात मेट्रोचे जाळे उभारण्याची सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी मेट्रो उभारणीकरता 39 हजार कोटी रुपयांची तरतूद असेल. राज्यातील मेट्रो प्रकल्पांच्यासाठी उभारणीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.

15:01 March 09

राज्यात 14 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार

राज्यात 14 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. ही सरकारी महाविद्यालये विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

14:58 March 09

आठवी पर्यंतच्या सर्वच सरकारी शाळांमधील मुलांना मोफत गणवेश

राज्यातील सरकारी शाळांमधील 8 वी पर्यंतच्या सर्वच मुलांना मोफत गणवेश पुरवण्याचा निर्णय बजेटमध्ये घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

14:56 March 09

पुण्यात नवीन मेट्रो प्रकल्प उभारण्याची घोषणा

पुण्यात नवीन मेट्रो प्रकल्प उभारण्याची घोषणा फडणवीस यांनी बजेट भाषणात केली. पुण्यामध्ये मेट्रो वाहतुकीची गरज आहे. शहर वेगाने विस्तरत आहे. तसेच वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणे गरजेचे आहे. हे ध्यानात घेऊन नवीन मेट्रो प्रकल्प उभारण्यात येईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

14:53 March 09

20000 अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात येणार

राज्यात नव्याने 20000 अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. बालकांच्या योग्य शिक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी बजेट भाषणात सांगितले.

14:50 March 09

राज्यात रस्त्यांसाठी 14000 कोटी रुपयांची घोषणा

राज्यातील रस्ते आणि पुलांच्या कामासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्यात रस्त्यांसाठी 14000 कोटी रुपयांची घोषणा बजेटमध्ये फडणवीस यांनी केली आहे.

14:46 March 09

सीमा भागातील गावांमध्ये सुविधा पुरवण्याची महत्वपूर्ण घोषणा

सीमा भागातील गावांमध्ये योग्य सुविधा आणि सेवा पुरवण्याची महत्वपूर्ण घोषणा फडणवीस यांनी केली. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

14:43 March 09

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनवर नेणार - फडणवीस

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनवर नेण्याची घोषणा बजेट भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी यासाठी राज्य सक्रिय असल्याचे सांगितले.

14:41 March 09

काजू बागायतदारांच्यासाठी 1345 कोटी रुपयांची तरतूद

राज्यातील शेतकऱ्याच्यासाठी भरीव तरतूद केल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्यांनी विशेषतः काजू बागायतदारांच्यासाठी 1345 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली.

14:38 March 09

रामोशी, वडारसह इतर समाजासाठी महामंडळे स्थापनेची घोषणा, प्रत्येकी 50 कोटी बीज भांडवल

रामोशी, वडार तसेच इतर समाजासाठी विविध कल्याणकारी महामंडळे स्थापन करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. या महामंडळांना बीजभांडवल म्हणून सुरुवातीला प्रत्येकी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

14:34 March 09

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आता 5 लाख रुपये मिळणार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या तरतुदीमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

14:31 March 09

महिलांना एसटीने फक्त अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार

राज्यातील महिलांच्यासाठी फडणवीस यांनी बजेट भाषणात मोठी घोषणा केली. महिलांना एसटीने प्रवास करताना सरसकट 50 टक्के तिकीट आकारण्यात येईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

14:25 March 09

घरघर जल योजनेअंतर्गत 17 लाख कुटुंबांना नळजोडणी

मराठवाड्यातील घरघर जल योजनेअंतर्गत 17 लाख कुटुंबांना नळजोडणी देण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

14:23 March 09

मराठवाड्यातील नागरिकांच्यासाठी घरघर जल योजना

मराठवाड्यात पाण्यासाठी वणवण करावी लागले. ही वणवण थांबवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांच्यासाठी घरघर जल योजना राबवण्यात येईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

14:21 March 09

86000 कृषी पंपांना तात्कार वीज जोडणी देणार

राज्यातील 86000 कृषी पंपांना तात्कार वीज जोडणी देण्यात येईल अशी घोषणाही फडणवीस यांनी केली. त्यामुळे पिकांना पाणी देण्याची चांगली सोय होईल. तसेच त्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

14:19 March 09

मच्छीमारांच्यासाठी 5 लाखांची विमा योजना

कोकणातील मच्छीमारांच्यासाठी मोठी घोषणा फडवीस यांनी केली. त्यांनी मच्छीमारांच्यासाठी 5 लाखांची विमा योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी बजेटमध्ये 269 कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे.

14:16 March 09

ड्रोन, सॅटेलाईट यंत्रणा वापरून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी वेळ लागू नये यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर पंचनाम्यांसाठी करण्यात येईल. त्यासाठी ड्रोन तसेच सॅटेलाईट यंत्रणा वापरून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील.

14:14 March 09

बुलडाण्यात संत्रा प्रक्रिया उद्योगासाठी 30 कोटी

संत्री उत्पादक शेतकऱ्यांसाठी फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी बुलडाण्यात संत्रा प्रक्रिया उद्योगासाठी 30 कोटी रुपयांची घोषणा केली.

14:12 March 09

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. 2 हेक्टरसाठी हे अनुदान देण्यात येईल. यासाठी सातबारावरील पीक नियोजन नोंद पुरेशी असेल.

14:10 March 09

शिवमहोत्सवासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद

राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमहोत्सवासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे.

14:08 March 09

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद

राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्यासाठी सरकारने 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

14:06 March 09

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट भाषणास सुरुवात केली आहे. त्यांनी सुरुवातीलाच काही महत्वाच्या घोषणा केल्या त्यामध्ये गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

13:58 March 09

उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणाची सुनावणी 15 मार्चला होणार

उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा म्हणजे दिवाणी स्वरूपाचा खटल्याला क्रिमिनल वळण देण्याचा प्रकार किरीट सोमैय्या करीत आहे. असीम सरोदे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ठाकरेंची मांडली बाजू आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार अशा प्रकारचे प्रकरण हे दिवाणी असतात याचा दाखला न्यायमूर्तीसमोर असीम सरोदे यांनी दिला आहे. या संदर्भातील सर्व बाजू न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी ऐकून घेतली पुढील सोनवणे 15 मार्चला आयोजित केली.

13:28 March 09

अभिनेता सतीश कौशिक यांचा पार्थिवाचे शवविच्छेदन, मृत्यूचे कारण आले समोर

अभिनेता सतीश कौशिक यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन सुरू झाले आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण म्हणून ह्रदयविकाराचा झटका आहे.

13:03 March 09

लोककलावंतांच्या कामाचे कॅटलॉग करून पोर्टल सुरू करण्यात येणार-सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या कामाचे कॅटलॉग करून त्यांना ऑर्डर मिळण्यास मदत करणारे पोर्टल स्थापन केले जाणार आहे. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

12:43 March 09

५० खोके, नागालँड ओके-गुलाबराव पाटील

राष्ट्रवादीने नागालँडमध्ये भाजप सत्ता स्थापन करत असताना मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. ५० खोके, नागालँड ओके, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

12:29 March 09

विरोधकांडून सोयीचे राजकारण सुरू-एकनाथ शिंदे

विरोधकांकडून दररोज खोक्याचा विषय असतो. हेच का बदलाचे वारे आहे. विरोधकांडून सोयीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केला आहे.

11:53 March 09

240 फ्लॅटमधील रहिवाशांना बिल्डर देणार घरभाडे

इमारतीला तडे गेल्याने पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या 240 फ्लॅटमधील रहिवाशांना स्थलांतर करावे लागले आहे. राहण्याच्या वेळी विकसकाकडून भाडे दिले जाईल, असे स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

11:51 March 09

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपच्या अश्विनी जगताप यांनी आमदारकीची घेतली शपथ

कसबा पेठ आणि चिंचवडमधून नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांनी आज विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेतली.

11:45 March 09

शेतकरी मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

शेतकरी मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

11:36 March 09

सभागृहात पुन्हा एकदा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक

सभागृहात पुन्हा एकदा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. नाफेडने अद्याप कांदा खरेदी सुरू केली नसल्याचा दावा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. हरभरा खरेदीही सुरू नसल्याची माहिती पवार यांनी सभागृहात दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला उत्तर देताना नाफेडने खरेदी सुरू केली असल्याचा दावा केला आहे. तसेच शेतकऱ्यांना आम्ही बारा हजार कोटी रुपये मदत दिली. पन्नास हजार रुपयांचा परतावा पण दिला आहे. जो तुमच्या सरकारने घोषित केला आहे. परंतु आम्ही परतावा दिला. शेतकऱ्यांना यापुढेही आम्ही मदत करू, असे आश्वासन सभागृहात दिले.

11:27 March 09

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कांदा खरेदी केला नाही-अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कांदा खरेदी केला नाही. कालच्या उत्तरात कोकण राहिले असल्याचे माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

11:10 March 09

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा-अजित पवार

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांच्या विधानसभेत घोषणाबाजी सुरू आहेत.

11:04 March 09

अर्थसंकल्पात वारे माप घोषणा आणि उधळपट्टीची शक्यता छगन भुजबळ


मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात वारेमाप घोषणा आणि उधळपट्टी केली जाण्याची शक्यता आमदार व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. २०१४ नंतर सरकारवर कर्जाचा बोजा वाढल्याचे भुजबळ म्हणाले. विधान भवनात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

10:03 March 09

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर करू नका-रोहित पवार

यंदाच्या अर्थसंकलपात अपेक्षा आहेत. योग्य असा अर्थसंकल्प मांडला जाईल अशी अपेक्षा आहे. पुरवणी मागण्या ज्या होत्या त्यात फक्त 50 टक्के खर्च झाला. असे हे धडाकेबाज सरकार आहे. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर करू नका. अनेक अडचणी राज्य समोर आहेत, त्याकडे लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. शिंदे-फडणीस सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे, त्या पार्श्वभूमीवर

10:01 March 09

डोंबिवलीतील अत्तराच्या गोदामाला आग; मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीमध्ये परफ्युमरी साहित्य साठवणाऱ्या एका गोदामाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

09:39 March 09

एप्रिलमध्ये होणारी महाविकास आघाडीची बैठक एप्रिलफुलसारखी-संजय शिरसाट

आमच्यासोबत न आल्यास उद्धव ठाकरेंचे काहीही होणार नाही. आजकाल मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहतात. एप्रिलमध्ये होणारी महाविकास आघाडीची बैठक एप्रिलफुलसारखी असल्याची टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.

08:47 March 09

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आगमन झाले. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांचे स्वागत केले.

08:28 March 09

ऑनलाइन जुगारावर बंदी घालणारे विधेयक तामिळनाडू राज्यपालांनी परत पाठविले!

तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी ऑनलाइन जुगारावर बंदी घालणारे आणि राज्यातील ऑनलाइन गेमचे नियमन करणारे विधेयक परत पाठवले. राज्यपालांनी 4 महिन्यांनी हे विधेयक परत पाठवले असून विधेयकाबाबत आणखी स्पष्टीकरण मागवले आहे.

07:32 March 09

मुंबई पोलिसांकडून पेपरफुटीप्रकरणी ५ जणांना अटक

मुंबई पोलिसांकडून पेपरफुटीप्रकरणी आणखी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी नगरमधील असल्याची माहिती समोर येत आहे.

07:31 March 09

राष्ट्रवादीच्या नागालँडचे मुख्यमंत्री रिओ यांना पाठिंबा, मात्र नवीन सरकारच्या भूमिकेवर मौन

राष्ट्रवादीने नागालँडचे सीएम रिओ यांना पाठिंबा दिला आहे. मात्र नवीन सरकारच्या भूमिकेवर मौन बाळगले आहे.

06:16 March 09

Maharashtra Breaking News : अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन, अभिनेते अनुपम खेर यांनी केले ट्विट

मुंबई : अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. ही माहिती अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून दिली आहे.

Last Updated : Mar 9, 2023, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details