मुंबई :अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केली. राज्याला आणि देशाला हादरवून सोडणारा महाराष्ट्रातील नुकताच उघडकीस आला आहे. (Lalit Patil Drug Case) या संदर्भातील प्रमुख आरोपी ललित पाटील, सचिन वाघ आणि नव्याने अटक केलेला हरीश पंत अशा सर्वांना पोलिसांनी अंधेरी न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हजर केलं होतं. (Lalit Patil police custody) न्यायालयानं आरोपींच्या संदर्भात पोलिसांकडील उपलब्ध दस्ताऐवज आणि विविध प्रकारची माहिती तथ्य आधारित असल्यामुळं चौकशी करता 30 ऑक्टोबर पर्यंत या सर्वांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
काय म्हणाले बचाव पक्षाचे वकील -आरोपीच्या वतीने पोलीस कोठडी अधिक देऊ नये. चौकशीच्या संदर्भात ते सहकार्य करत असल्याचं वकिलांनी म्हणणं मांडलं आहे. परंतु, पोलिसांनी या संदर्भात दावा केला की, "अत्यंत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा काळाबाजार केला जात आहे. त्यामध्ये प्रमुख आरोपीसह इतर दोन आरोपी त्यांना हजर केलं आहे. याशिवाय इतर अनेक आरोपी यामध्ये असू शकतात. त्यामुळे त्यांची चौकशी होणं अत्यावश्यक आहे.
पोलिसांच्या वतीने वकील म्हणाले की...:पोलिसांच्या वतीने वकिलांनी न्यायालयाच्या पटलावर माहिती मांडली की, राज्याच्या विविध ठिकाणी अनेक लोक या ड्रग्जच्या काळाबाजाराशी संबंधित असू शकतात. त्याबाबत तपास यंत्रणा तपास करत आहेत. परंतु, त्या तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे धागेदोरे आणि विविध व्यवहार जे आरोपी ललित पाटील आणि इतर आरोपींकडून केले गेले आहेत. त्याची तपासणी आणि त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. ही चौकशी गतिमान पद्धतीने होण्यासाठी आरोपींची प्रत्यक्ष समोर बसून चौकशी करणं आवश्यक असल्याचं देखील न्यायालयाच्या समोर मांडलं गेलं.
त्याची ओळख 'बिग फिश' नावाने :पोलिसांनी हे देखील सांगितलं की, हरीश पंत याला हरियाणातून ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्या मार्गदर्शनाखालीच राज्यात विविध ठिकाणी ड्रग्ज बनवण्याचे कारखाने सुरू असल्याचं सांगितलं. हरीश पंत याची या संदर्भातील व्यवहार करतानाची भाषा ही "बिग फिश" या नावाने होती. त्याला त्याच नावाने देखील ओळखले जात असे. पोलिसांच्या वतीने वकिलांचे दावे ऐकल्यानंतर अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 30 ऑक्टोबर पर्यंत आरोपींची पोलीस कोठडी निश्चित केली.
हेही वाचा:
- Lalit Patil Case Update : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; 'या' कारणामुळे पोलीस करणार माजी महापौरांची चौकशी...
- MLA Dhangekar On Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो- आमदार रवींद्र धंगेकर
- Dada Bhuse On Lalit Patil Case: संजय राऊतांच्या मार्गदर्शनात ड्रग्ज माफिया ललित पाटील शिवसेनेत आला होता- दादा भुसे