महाराष्ट्र

maharashtra

Gunratna Sadavarte on Raj Thackeray : 'राज ठाकरेंना अटक करा', गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांत तक्रार

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 1:28 PM IST

Gunratna Sadavarte on Raj Thackeray : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. तसंच मुलुंड येथील टोलनाका जाळपोळ प्रकरणात राज ठाकरे मास्टरमाईंड असून त्यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केलीये.

Gunratna Sadavarte on Raj Thackeray
राज ठाकरेंविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांत तक्रार

मुंबई Gunratna Sadavarte on Raj Thackeray :टोल नाक्यावरील टोल वसुली विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल मुलुंड टोल नाक्यावर जाळपोळ आंदोलन केलं. काल (9 ऑक्टोबर) सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत टोल बंद करा अन्यथा टोलनाके जाळून टाकू असं आव्हान दिल्यानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी टोल नाक्यांवर आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान, याप्रकरणावरुन आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केलीये. तसंच टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीनं अटक करा असा लेखी उल्लेखही त्यांनी तक्रारीत केलाय.



दादागिरी खपवून घेणार नाही :हिंदू राष्ट्र भारत हमारा असं मानणारं आमचं संघटन आहे. मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू सगळ्यांसाठी महाराष्ट्र-मुंबई एकत्र नांदण्यासाठी आहे. पोलोचे खेळाडू कधीतरी बाहेर येऊन बोलतात. महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही. डंके की चोट पे सांगत आहोत. काही बरेवाईट झालं तर त्याला राज ठाकरेच जबाबदार राहतील. तुम्ही पोलोचे खेळाडू असाल, पाहुणे कलाकारांसारखे येत असाल. पण महाराष्ट्राला पाहुण्या कलाकारांची गरज नाही. राज ठाकरे यांची पुन्हा-पुन्हा दादागिरी खपवून घेणार नाही, असं सदावर्ते म्हणाले.

13 मनसैनिकांना अटक : कष्टकरी जनसंघटनेची सीआरपीसी कलम 154 अन्वये तक्रार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलीये, त्यामुळे तातडीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी आक्रमक मागणी सदावर्ते यांनी केली आहे. दरम्यान, काल मुलुंड टोलनाका जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 13 मनसैनिकांना नवघर पोलिसांनी अटक केली. त्याचप्रकारे जळता टायर फेकणाऱ्या रोशन वाडकर या मनसैनिकाला भारतीय दंड संहिता कलम 436 अन्वये गुन्हा दाखल करू अटक करण्यात आलं. शिवाय ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांना देखील काल अटक करण्यात आली. त्यामुळे आता हे प्रकरण अजूनच पेटून उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. MNS Protest On Toll : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, बुलढाण्यात पडसाद
  2. Devendra Fadnavis on Toll Plaza: टोलनाक्यावरुन फडणवीस यांची तब्बल आठ वर्षापूर्वीची माहिती देऊन सारवासारव; तर राज ठाकरे पुन्हा आक्रमक
  3. Raj Thackeray on Toll Plaza : राज ठाकरेंचे पुन्हा लाव रे तो व्हिडिओ, टोल नाक्यांवरून राज्य सरकारला दिला 'हा' इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details