मुंबई :मुंबईमध्ये नेहमीच नवनवीन घोटाळे समोर येत असतात. बारा वर्षांपूर्वी मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीचा घोटाळा समोर आला होता. या संदर्भात सीबीआयने कारवाई केली होती. त्या प्रकरणाचा खटला सीबीआय विशेष न्यायालयात सुरू होता. या गृहनिर्माण सोसायटीच्या संबंधित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत काँग्रेसचे माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी त्यांचा मुलगा कैलास गिडवाणी आणि खाजगी वकील जवाहर जग्यासी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवला होता. अनेक वर्षे हा खटला चालला होता. 2021 मध्ये कन्हैयालाल गिडवानी यांचे निधन झाले होते.
भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्याच्या तरतुदी :या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांवर देखील आरोप केले गेले होते, त्या अनुषंगाने चौकशा देखील झाल्या होत्या. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ज्या भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आरोप मुक्त करायला हवे होते. ते केले नाही, म्हणून त्यांनी सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यानंतर न्यायमूर्ती भारतीय डांगरे यांनी या आरोपींना आरोप मुक्त केले.
उच्च न्यायालयात याचिका : सीबीआय न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्याच्या कलम सात व कलम 12 आणि कलम 13 या तरतुदीनुसार उपरोक्त आरोपींना 12 फेब्रुवारी 2020 मध्ये आरोपमुक्त केले होते. परंतु त्याच कायद्यातील कलम 8 व कलम 9 नुसार आरोप मुक्त केले नव्हते. म्हणून सीबीआय विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात आरोपींनी दाखल केली होती. कन्हैयालाल गिडवाणी यांचे नाव आदर्श घोटाळ्यामध्ये आरोपी म्हणून होते.