मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 1978 मध्ये काँग्रेसचे सरकार पाडत जनसंघासोबत घरोबा केला. काँग्रेस मधून 40 आमदारांसोबत बाहेर पडलेले शरद पवार यांच्या त्या खेळीला मुत्सद्देगिरी म्हणायचे आणि त्यापेक्षा अधिक मेरीटवर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या खेळीला म्हणायचे नाही, हा दुटप्पीपणा का एवढेच फक्त आपण विचारले होते. त्यावेळेस मी प्राथमिक शाळेत होतो की, जन्माला यायचा होतो. याचा काहीही संबंध नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 1978 च्या राजकीय खेळीचा उल्लेख केल्यानंतर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी प्राथमिक शाळेत होते. अशी टिप्पणी केली होती, त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
तेव्हा जनसंघासोबत कसे : काँग्रेस मधून बाहेर पडून 1978 मध्ये सरकार स्थापन करताना जनसंघाचा पाठिंबा पवारांनी घेतला. आता तर आम्ही युतीमध्ये एकत्र लढलो होतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अतिशय मेरीटवर राजकीय चाल केली आहे. त्यामुळे त्यांच्या या खेळीला दोष कसा दिला जाऊ शकतो, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.