महाराष्ट्र

maharashtra

Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनात मुंबईच्या पाणी प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

By

Published : Dec 21, 2022, 4:12 PM IST

हिवाळी अधिवेशनात ( winter session ) मुंबईच्या पाणी प्रश्नावरून ( Mumbai water issue ) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी ( Clashed between Ruling party and opposition ) झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत छुप्या पाणी कपातीचे पडसाद बुधवारी विधान परिषदेत उमटले. शिवसेना आमदार अनिल परब, विलास पोतनीस यांनी मुंबईतील पाणी समस्याचा पाढा वाचला​​. मंत्री शंभूराज देसाई यांनी, पाणी समस्या नसल्याचे स्पष्ट केले. दोघांमध्ये यावेळी चांगलीच जुंपली. अखेर येत्या 15 दिवसांत पाणी पुरवठ्याबाबत अहवाल सादर करण्याची ग्वाही मंत्री शंभूराज देसाईंनी दिल्याने वादावर पडदा पडला.

Winter Session 2022
हिवाळी अधिवेशन

मुंबई : नागपूरात सध्या हिवाळी अधिवेशन ( winter session ) सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून खंडाजगी होत आहे. मुंबईतील बोरवली पूर्वेकडील काजूपाडा, केतकीपाडा येथे पाण्याची समस्या मोठी आहे. पाण्याची व्यवस्था करण्याची ग्वाही दिली होती. पाण्याची टाकी बांधली, मात्र पाणी टंचाई आजही भेडसावत आहेत. मुंबईतील या प्रश्नावरून ( Mumbai water issue ) सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे ( Clashed between Ruling party and opposition ) पाहायला मिळाले.

पाणी प्रश्नावर चर्चा : मुंबईतील पाणी प्रश्नाबाबत राज्य शासनाकडे याबाबत विचारणा केली असता, सुरळीत पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला आहे. महापालिकेने दिलेली उत्तरे दिशाभूल करणारी आहेत. येथे पाणी पुरवठा करण्यासाठी कोणती ठोस यंत्रणा उभारणार, असा प्रश्न विलास पोतनीस यांनी विचारला. मंत्री शंभूराजे देसाईंनी यावर उत्तर दिले. सध्या पाणी पुरवठा वाढवून दिला आहे. दीडशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. बोरीवली पूर्वेकडील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या. पाण्याच्या वेळेत ही बदल करुन सुरळीत पाणी पुरवठा केला आहे, असे मंत्री शंभूराज देसाईंनी केले.

अनिल परब यांनी उपस्थित केला प्रश्न : शिवसेना आमदार अनिल परब यांनी या उत्तरावर आक्षेप घेतला. पाण्याची कपात आहे का, मुंबईत पाण्याच्या समस्येची आम्हाला माहिती आहे. पाणी मुबलक असताना, पाणी का येत नाही. उपनगरात पाणी कपातीची कारणे काय आहेत. अधिकारी आणि मंत्र्यांनी विभागात पाहणी करावी. तसेच दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परब यांनी केली. मंत्री शंभूराजे देसाईंनी यावर उत्तर देताना, अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. परब यांनी यावर हरकत घेतली. दोघांमध्ये यामुळे जोरदार जुंपली. शिक्षण आमदार कपिल पाटील यांनी यात हस्तक्षेप करत वादावर तोडगा काढण्याची सूचना केली.

मंत्री देसाईंचा खुलासा : मंत्री देसाईंनी कुठेही पाणी कपात नाही. महापालिका स्तरावर दुरुस्ती कामे करायची होती, ती पूर्ण झाली आहेत. तीन- चार महिन्यांत हा प्रश्न निर्माण झाला असेल तर ती जबाबदारी आमची आहे. परंतु, प्रदीर्घ काळापासून उपाय योजना होणे करणे गरजेचे होते. निर्धारीत वेळेत नागरिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. तरी काही व्यत्यय येत असेल तर 15 दिवसांत अहवाल सादर करुन तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना मंत्री देसाईंनी मनपा प्रशासनाला दिल्या. दरम्यान, पाणी टंचाईच्या वेळी अडचण समजू शकतो. परंतु, राजकीय वक्तव्य करण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला आमदार अनिल परब यांनी दिला. दोघांमध्ये पुन्हा शाब्दीक फैरी झडल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details