महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपर येथील अमृत नगरमध्ये स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला मुंबई CM Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्वच्छता मोहीम अभियान मुंबईमध्ये राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एन विभागातील अमृत नगर सर्कल येथे या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री शिंदें यांनी नाव नं घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली.
- नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे : यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एका संपूर्ण विभागाची स्वच्छता ही एकाच दिवशी २५०० हजार कर्मचारी करत आहेत. काही लोक हा स्टंट असल्याची टीका करत आहेत, पण खरं चित्र इथं येऊन बघा. तसंच रस्ते धुण्यासाठी क्षारयुक्त पाणी वापरले जातंय. यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात नाहीय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
पुढं ते म्हणाले की, फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पाच हजार मार्शल नेमण्यात येणार आहेत. तसंच विरोधी पक्षांच्या मनाप्रमाणे काही घडत नसेल. त्यामुळं ते सरकारच्या विरोधी मोर्चे काढतात. धारावीच्या विकासासाठी सॅकलिंग नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला विरोध केला गेला. त्यांचा पर्याय म्हणून, अदानी यांच्या नावाचा विचार केला गेला. मात्र, सॅकलिंगच्या नावाला विरोध का केला गेला? तसंच गेल्या 20 वर्षांत अशी साफसफाई पाहिली का? काही लोक दुसरी साफसफाई करत होते, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
- मराठा आरक्षणाबाबतही दिली प्रतिक्रिया :यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकारचं धोरण, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा बांधवांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा-
- ...त्यामुळं ठाकरेंच्या सत्तेचं 'लंका'दहन, ठाकरे सरकार पाडण्यात माझा वाटा - मुख्यमंत्री शिंदे
- "ज्यांनी अदानींची सुपारी घेतली, त्यांना ठेचून टाकू", उद्धव ठाकरेंचा धारावी बचाव आंदोलनात इशारा
- आमदार अपात्र प्रकरण: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची उलट तपासणी पूर्ण, सोमवारी दीपक केसरकर यांचा नंबर