मुंबई - सगळीकडे दिवाळीची धूम ( Dhoom of Diwali ) पसरलेली असताना राजकारणीही एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात व्यस्त आहेत. शिंदे - फडणवीस सरकार स्थापन ( Shinde Fadnavis Govt ) झाल्यावर राज्यात विशेषतः मुंबईत भाजप ने सर्व सण उत्सव धुमधडाक्यात करण्याचा सपाटा लावला आहे. यावरून त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून टीका केली ( Shiv Sena criticizes BJP ) जात आहे. या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच नागपूर, कोकण, मराठवाडा, नाशिक व अकोला असे ३ शिक्षक व दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. या साठी मराठवाडा शिक्षक मतदार संघातून भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबईत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली.
तुम्ही सुद्धा मिठाई वाटा -राज्यात, मुंबईत दीपावलीचे फटाके फुटायला सुरुवात झाली असताना आता राजकारण्यांनी सुद्धा एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल सुरू केला आहे. भाजप ज्या पद्धतीने मुंबईत सर्व सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे करत आहे ते पाहता विरोधक विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भाजपवर टीका केली जात आहे. या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मागच्या सरकार मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे यांना अडीच वर्षाचा कालावधी भेटला होता. तेव्हा त्यांनी सर्व हिंदू सणांवर निर्बंध लावले. आता आमच्या सरकारने सर्व निर्बंध हटवले. सरकार मध्ये तेव्हा तुम्ही होता मग का नाही उत्सव साजरे केले? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला. तसेच आता आम्ही करतोय तर तुम्हाला का आपती आहे. तुम्ही सुद्धा मिठाई वाटा. वाटल्यास आम्ही एक मिठाईचा डब्बा तुम्हाला पाठवतो. असा मिश्किल टोमणा सुद्धा त्यांनी लगावला.