महाराष्ट्र

maharashtra

विदेशी मद्याची अवैद्य वाहतूक, 10 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Apr 23, 2021, 1:41 PM IST

लातूर शहरातील राजीव गांधी चौकात बेकायदेशीर विदेशी मद्याची वाहतूक करताना शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 10 लाख 20 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Latur
Latur

लातूर: शहरातील राजीव गांधी चौकात बेकायदेशीर विदेशी मद्याची वाहतूक करताना शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 10 लाख 20 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैद्य मद्य विक्री व वाहतुकीस जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. शहरातील राजीव गांधी चौकातून काल (22 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास एक क्रेटा कार विदेशी मद्याची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून औसा रोडवरून लातुरात येणारी क्रेटा कार (एमएच 24 डब्ल्यू 8700) राजीव गांधी चौकात येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. इस्माईल सिद्दिकी (वय 45) व आकाश चंद्रकांत अनवले (वय 24) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नाव आहेत.

सदरील कार ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात 20520 रुपयांचे विदेशी मद्य व 10 लाख रुपयांची क्रेटा कार असा एकूण 10 लाख 20520 रुपयांचा मुद्देमाल सापडला असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.

या गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details