महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; 65 बंधारे पाण्याखाली

By

Published : Aug 16, 2020, 2:57 PM IST

धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून एकूण 3 दरवाजांसह विद्युत विमोचकातून एकूण 5,684 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूरात पावसाचा जोर कायम
कोल्हापूरात पावसाचा जोर कायम

कोल्हापूर -जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. धरण क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून एकूण 3 दरवाजांसह विद्युत विमोचकातून एकूण 5,684 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळीसुद्धा 33.7 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय राज्य आणि जिल्हा मार्ग मिळून जवळपास 12 वाहतूक मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहेत.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उद्यापर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी असून धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे लवकरच इशारा पातळीसुद्धा ओलांडण्याची शक्यता असून कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.

सध्या जिल्ह्यातील इतर धरणामधून पुढील प्रमाणे विसर्ग चालू आहे :

तुळशी - 328

वारणा - 12984

दुधगंगा - 4800

कासारी - 1750

कडवी - 1608

कुंभी - 350

पाटगाव - 00

चिकोत्रा - 00

चित्री - 1568

जंगमहट्टी - 335

घटप्रभा - 6331

जांभरे -1694

कोदे - 703

ABOUT THE AUTHOR

...view details