महाराष्ट्र

maharashtra

कुठपर्यंत शांत बसायचं, वेळ आली तर राष्ट्रवादीला बुडवू - खासदार संजय जाधव

By

Published : Aug 9, 2021, 12:37 PM IST

जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीसाठी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष सुरू झाला.

shiv-sena-mp-sanjay-jadhav-
खासदार संजय जाधव

जालना - परभणी येथील जिल्हाधिकारी बदलण्यासाठी मी फक्त पत्र दिले होते. मात्र राष्ट्रवादीवाल्यांनी माझ्याविरोधात रान उठवले. त्यामुळे किती दिवस सहन करायचं, किती दिवस शांत बसायचं. माकडीनसुद्धा वेळ आली की पिल्लू पायाखाली घालते, तसं वेळ आली तर राष्ट्रवादीचं करू, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय ( बंडू ) जाधव यांनी घनसावंगीत केले. मात्र त्यांच्या या वक्तव्याने आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पदाधिकारी मेळाव्यात बोलताना खासदार संजय जाधव

राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये परभणी येथील जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीवरुन धुसफुस सुरू आहे. जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीसाठी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघर्ष सुरू झाला. आता शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याने या वादात तेल ओतण्याचे काम केल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details