महाराष्ट्र

maharashtra

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम

By

Published : May 16, 2021, 4:47 PM IST

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे हवामान बदलाचा प्रत्यय येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या.

Strong winds and rain Jalgaon
तौक्ते चक्रीवादळ परिणाम जळगाव

जळगाव - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे हवामान बदलाचा प्रत्यय येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या.

पावसाचे दृश्य

हेही वाचा -जळगावात कोव्हॅक्सिन लसीचे २३०० डोस उपलब्ध; दुसऱ्या डोससाठीच लसीकरण होणार

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. काल, शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर आज देखील सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी सूर्यदर्शन झाले. जळगाव शहरात दुपारी सूर्यदर्शन होऊन पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. अडीच वाजताच्या सुमारास वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. 15 ते 20 मिनिटे पाऊस पडला.

जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी

वातावरणात बदल झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जामनेर, अमळनेर, पारोळा तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतात असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे. पारोळा तालुक्यातील म्हाळपूर गावात वाऱ्यामुळे घरांवर झाड कोसळून नुकसान झाले.

उकाड्याने नागरिक हैराण

जळगाव जिल्ह्यातील तापमानात सध्या काही अंशी घट झाली असली तरी वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे, उकाडा वाढला आहे. वीज वितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व कामे सुरू असल्याने दुपारच्या वेळी वीज पुरवठा खंडित केला जात आहे. अशा परिस्थितीत उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

हेही वाचा -जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध आणखी कठोर होणार; जिल्हाधिकार्‍यांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details