महाराष्ट्र

maharashtra

Gulabrao Patil Criticized Narayan Rane : आम्ही नारायण राणे सारख्या माणसाला खपवतो - गुलाबराव पाटील

By

Published : Jan 3, 2022, 4:44 PM IST

Updated : Jan 3, 2022, 4:58 PM IST

खासदार उन्मेष पाटील यांनी कुंपणच शेत खाते अशी टीका करत गुलाबराव पाटालांवर केली होती. याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Guardian Minister Gulabrao Patil ) यांनी खासदारांच्या टीकेवर पलटवार करत नदी परिक्रमा मोहीमेवर टीका करत त्यांनी केलेली टीका म्हणजे त्यांना गुलाबराव पाटील नावाचा रोग झाला असून केवळ स्टंटबाजी म्हणून खासदार सर्व खटाटोप करत आहे, अशी टीक गुलाबराव पाटलांनी केली आहे.

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

जळगाव -जळगावचे खासदार उन्मेष पाटील ( MP Unmesh Patil ) यांनी गिरणा नदीच्या संवर्धनासाठी गिरणा परिक्रमा मोहीम सुरू केली आहे. दरम्यान वाळू संदर्भात बोलताना खासदार उन्मेष पाटील यांनी कुंपणच शेत खाते अशी टीका करत गुलाबराव पाटालांवर केली होती. याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Guardian Minister Gulabrao Patil ) यांनी खासदारांच्या टीकेवर पलटवार करत नदी परिक्रमा मोहीमेवर टीका करत त्यांनी केलेली टीका म्हणजे त्यांना गुलाबराव पाटील नावाचा रोग झाला असून केवळ स्टंटबाजी म्हणून खासदार सर्व खटाटोप करत आहे. त्यांनी गुलाबराव पाटलांच्या नादी लागू नये, नारायण राणे सारख्या माणसाला आम्ही खपवतो हे तर चिल्लर असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात १५ ते १८ वर्षाआतील मुलांचे लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया देतांना

जळगाव जिल्ह्यात १५ वर्षांवरील एकूण २ लाख २५ हजार मुला-मुलींची पात्र संख्या आहे. त्या अनुषंगाने जळगाव शहरात छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर, डी.बी.जैन हॉस्पिटल शिवाजीनगर, कांताई नेत्रालय निमखेडीरोड आणि चेतनदास मेहता हॉस्पिटल सिंधी कॉलनी, जळगाव या चार केंद्रांवर तर जिल्ह्यात १४ तालुकास्तरावर एक स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून प्रत्येकी एक असे १४ केंद्र चालू ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर पहिल्या दिवशी ३ जानेवारी रोजी ५०० लाभार्थींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड दोन्ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. टप्प्याटप्पाने लसीकरणाला गती देण्यात येईल. मागणीनुसार जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसीचा पुरवठासुद्धा होईल, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी समाधान वाघ यांनी दिली आहे.

हेही वाचा -Vaccination Started for 15-18 Year Old Children : देशात १५ ते १८ वर्ष्याच्या मुलांचे लसीकरण सुरू, पुण्यातील हा खास रिपोर्ट

Last Updated :Jan 3, 2022, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details