महाराष्ट्र

maharashtra

साखरा येथे वयोवृद्ध महिलेचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरला

By

Published : Apr 10, 2021, 5:58 PM IST

साखरा येथे एका वयोवृद्ध महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी गावापासून काही अंतरावर मृतदेह पुरून टाकल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मागील काही वर्षापूर्वी देखील येथे वयोवृद्ध महिलेचा खून झाला होता.

महिलेचा मृतदेह आढळला
महिलेचा मृतदेह आढळला

हिंगोली - जिल्ह्यात काही दिवसांपासून खुनाच्या घटनेत वाढ झाली आहे. सेनगाव तालुक्यात ह्या घटना सर्वाधिक वाढल्या आहेत. याच भागातील साखरा येथे एका वयोवृद्ध महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी गावापासून काही अंतरावर मृतदेह पुरून टाकल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मागील काही वर्षापूर्वी देखील येथे वयोवृद्ध महिलेचा खून झाला होता.

भारजाबाई मारोती इंगळे (वय 82) असे खून झालेल्या वयोवृद्ध महिलेच नाव आहे. भारजाबाई या आपल्या मुला पासून वेगळ्या राहतात. रात्री 1 ते 5 या कालावधीत अज्ञात मारेकर्‍यांनी वयोवृद्ध महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी गावापासून काही अंतरावर मृतदेह करून टाकला होता. मात्र रात्री गावात कुत्रे भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे ग्रामस्थांनी कुत्रे भुंकण्याचा दिशेने धाव घेतली. त्यावेळी काही जण पळताना आढळून आले.

सकाळी महिला घरात दिसून आली नाही. त्यामुळे महिलेचा शोध घेतला असता, भारजाबाईचा मृतदेह अर्धवट पुरलेल्यास्थितीत आढळून आला. घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शेवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details