महाराष्ट्र

maharashtra

रुग्णालयात दाखल होण्यास नकार देणाऱ्या कोरोनाग्रस्त महिलेची सुखरुप प्रसुती

By

Published : May 17, 2021, 7:50 PM IST

भामरागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य पथक ताडगाव अंतर्गत असलेल्या कोसफुंडी गावातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका गरोदर महिलेची सुखरुप प्रसुती झाली आहे. बाळ व माता सुखरुप आहेत.

छायाचित्र
छायाचित्र

गडचिरोली -भामरागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य पथक ताडगाव अंतर्गत असलेल्या कोसफुंडी गावातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका गरोदर महिलेची आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे सुखरुप प्रसुती झाली आहे. बाळ व माता सुखरुप आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी चांगला रस्ताही नसल्याने वाहने जाऊ शकत नाही. वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. प्रसूतीचा दिवस आल्यानंतर दवाखान्यात राहायला काही लोक तयार होत नाहीत. त्यामुळे अनेक जण रुग्णालयात न जाता गावातच वैदूकडे उपचार घेणे पसंत करतात. अनेक महिलांची प्रसूती ही घरीच करतात. आशाच प्रकार भामरागड तालुक्यतील कोसफुंडी गवातील एका गरोदर महिला आरोग्य तपासणीसाठी हेमलकसा लोकबिरादरी दवाखान्यात दाखल झाली. त्यांना कोविडची लक्षणे दिसून येत असल्याने कोविड तपासणीसाठी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रसूती दिवसही जवळ आली आहे सुखरुप प्रसूतीसाठी दवाखान्यात भर्ती रहायला सांगितले. तरी ती ऐकायला तयार नव्हती. डॉक्टरांनी तहसीलदार व ठाणेदाराला समजावून सांगण्यासाठी बोलविले. त्यांनीही दवाखान्यातच राहण्याची सल्ला दिला. त्यानंतरही ती महिला न ऐकता गावी निघून गेली.

त्यानंतर आशा वर्कर अनिता रंजित एक्का, आरोग्य सेवुका संगीता वढणकर व अंगणवाडी सेविका देवीका परसालवार यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गरोरदर महिलेच्या जाऊन त्यांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तरीही त्यांनी व कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम यांच्या सूचनेनुसार किती प्रयत्न केली तरी नकारच मिळाला. शेवटी घरीच आशावर्कर, आरोग्य सेविका, आंणवाडी सेविका यांनी कळजी पूर्वक सुखरूप प्रसुती केली. बाळ आणि आई दोघेही सुखरुप आहेत. अंगणवाडी सेविका व आशावर्कर नियमित तपासणी करुन बेबी किट व आवश्यक पोशक आहार त्या महिलेला देण्यात आले.

हेही वाचा -दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात 550 जण कोरोनामुक्त, 12 मृत्यूंसह 276 रुग्णांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details