महाराष्ट्र

maharashtra

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 72 शाळा अंधारात; जिवती तालुक्यातील 37 शाळांचा समावेश

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 10:53 PM IST

No Electricity चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 72 शाळांमध्ये वीज नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर एकट्या जिवती तालुक्यातील 37 शाळांत वीज नाही. त्यामुळं या शाळेत प्रकाश कधी पडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Chandrapur Zilla Parishad schools
Chandrapur Zilla Parishad schools

चंद्रपूर No Electricity:आपण सध्या भारतीय स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत आहोत. मात्र, तरीही देखील देशातील काही भाग विकासापासून कोसो दूर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1 हजार 653 शाळांपैकी 72 शाळांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. आदिवासी, दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात तब्बल 47 शाळा आहेत. या शाळात आत्तापर्यंत वीज पोहचलेली नाहीय. सर्वांचा शिक्षण मूलभूत अधिकार आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाची सुरूवात सरकारनं केलीय. मात्र, अतिदुर्गम भागात अभियानाचा उजेड पडलेला दिसत नाही.


72 शाळांमध्ये वीज नाही : सरकारनं 4 ऑगस्ट 2021 रोजी नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत एक योजना सुरू केली. त्याद्वारे मुलांच्या शिक्षण तसंच विकासासाठी काम करायचं होतं. या योजनेंतर्गत शाळांमधील पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण, शिक्षकांचा विकास, त्यांचे प्रशिक्षण याकडंही लक्ष दिलं जाणार होतं. मात्र 72 शाळांमध्ये वीज नसल्यानं आता याची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.





इंटरनेट पासून शाळा कोसो दूर :जिल्ह्यात एकूण 1 हजार 653 शाळा आहेत. यात 963 प्राथमिक, 572 माध्यमिक, तर 18 उच्च माध्यमिक शाळा आहेत. शासनातर्फे रोज कुठला ना कुठला अहवाल शिक्षकांकडून मागविण्यात योतो. अशातच आता ऑनलाइन हजेरीचा बडगा शासनानं उगारला आहे. परंतु, सरकारतर्फे अद्याप एकाही शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळं काम करायचं कसं हा मोठा प्रश्न आहे.

सर्व शिक्षा अभियानात हव्या 'या' गोष्टी :

  • शाळा उपलब्ध नसलेल्या अधिवासांमध्ये शाळा उभारणं
  • शाळांमध्ये पायाभूत सुविधा करणे, पिण्याच्या पाण्याची व्यावस्था करणं
  • शाळांच्या देखरेख, सुधारणेसाठी आर्थिक मदत पुरविणं
  • अतिरिक्त शिक्षक पुरविणं
  • शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमतेत वाढ करणं.
  • शैक्षणिक साहित्य विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणं
  • पाठयपुस्तकं, गणवेश पुरविणं
  • जीवन कौशल्ये विकसित करणारं मूलभूत शिक्षण देणं
  • मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं
  • संगणकाचं प्रशिक्षण देणं
  • दिव्यांग मुलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करूण देणं

वीज पुरवठा नसलेल्या शाळा :

चंद्रपूर02
वरोरा01
चिमूर01
नागभीड01
ब्रह्मपुरी01
सिंदेवाही01
सावली02
मूल03
पोंभुर्णा01
बल्लारपूर01
राजुरा10
कोरपना10
जिवती37
एकूण शाळा72

हेही वाचा -

  1. फडणवीसांची नवाब मलिक यांच्या नावावर महायुतीमध्ये घेण्यास फुली; देश महत्त्वाचा म्हणत अजित पवारांना दिलं पत्र
  2. देवेंद्रभाऊ, सरडेसुद्धा लाजून आत्महत्या करतील, सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
  3. 'लिव्ह इन रिलेशनशिप' एक आजार; त्याला वेळीच आळा घाला, भाजपा खासदाराची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details