महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Viral Call Recording: आईच्या कॉल रेकॉर्डवरून मुलीने लावला वडिलांच्या खुनाचा छडा

50 वर्षीय महिलेने प्रियकराला सोबत घेऊन 65 वर्षीय पतीचा खून केल्याची ( Wife Killed Husband ) घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. एका कॉल रेकॉर्डिंगने हे प्रकरण ( Call recording reveals murder ) उघडकीस आले असून महिलेसह प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.Wife Killed Husband : आईच्या कॉल रेकॉर्डवरून मुलीने लावला वडिलांच्या खुनाचा छडा

Wife Killed Husband
Wife Killed Husband

By

Published : Nov 18, 2022, 9:27 PM IST

Updated : Nov 18, 2022, 10:40 PM IST

चंद्रपूर :50 वर्षीय महिलेने प्रियकराला सोबत घेऊन 65 वर्षीय पतीचा खून ( Wife Killed Husband ) केल्याची घटना घडली आहे. एकाच चौकात वेगवेगळा व्यवसाय करताना दोघांचे अनैतिक संबंध जुळले होते यातूनच पत्नीने पतीचा काटा काढला आहे.

कॉल रेकॉर्डवरून वडिलांच्या खुनाचा छडा

सर्वांना वाटले नैसर्गिक मृत्यू -एका कॉल रेकॉर्डिंगने या संपूर्ण हत्येचा कट ( Call recording reveals murder ) समोर आला. मुलींच्या हातात तब्बल तीन महिन्यांनंतर ही रेकॉर्डिंग लागली आहे. हत्या करणाऱ्या आईसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ब्रम्हपुरी शहरातील ही घटना असून रंजना रामटेके, मुकेश त्रिवेदी असे आरोपींचे नाव आहेत.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - 6 ऑगस्ट 2022 रोजी ब्रम्हपुरी शहरातील गुरुदेव नगरात राहणाऱ्या श्याम रामटेके यांचा मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी रंजना यांनी आपल्या दोन्ही मुलींना वडील हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावले असा निरोप दिला. आईने सांगितलेली बाब सत्य मानून नागपुरात असलेल्या दोन्ही मुली परत आल्या. यानंतर आई एकटीच घरी राहते यावरून लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली. मात्र, तिला आईच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आले. रंजना रामटेके यांचे आंबेडकर चौकात छोटे जनरल दुकान आहे. या दुकानालगतच मुकेश त्रिवेदी यांचे भाजीपाला बांगडी विक्रीचे दुकान आहे.

तोंडावर उशी दाबून केला खून - मुकेश त्रिवेदी यांचे वारंवार घरी येणे मुलींना खटकू लागल्यावर दोघींनी आई, मुकेश त्रिवेदी दोघांनाही समाजात बदनाम होण्याबाबत समज दिली होती. आई एकटीच राहत असल्याच्या काळात मुलीने तिला आपला स्मार्टफोन देऊ केला होता. मात्र वडिलांच्या निधनानंतर तिने हा मोबाईल परत स्वतःकडे घेतला. त्यावेळेस तिला 6 ऑगस्ट रोजी पहाटेचे हे दहा मिनिटांचे ऑडिओ रेकॉर्डिंग ( mother call records ) सापडले. त्यावरून मुकेश त्रिवेदी या प्रियकराच्या मदतीने कट करून प्रथम जेवणात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. नंतर झोपलेल्या अवस्थेत हातपाय बांधून आईने तोंडावर उशी दाबून वडिलांचा खून केल्याची माहिती मिळाली.

गुन्ह्याची कबुली -मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रंजना रामटेके, मुकेश त्रिवेदी यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यात सर्व सत्य पुढे आले. ही घटना उशारी माहिती जरी झाली असली तरी मुलींनी समय सुचकता दाखविल्याने सदर प्रकरण उघडकीस आले असल्याचे मत ब्रम्हीपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रोशन यादव यांनी व्यक्त केलं आहे. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन दिवसीय पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी तपास पूर्ण केला. सध्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आई असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत अधिकचा तपास उपविभागीय पोलीस अधीकारी इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Last Updated : Nov 18, 2022, 10:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details