बुलडाणा :दोन खासगी प्रवासी बस समोरामोर धडकून झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 19 प्रवासी जखमी झाले. हा अपघात मुंबई-नागपूर महामार्गावर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर घडला. या दोन्ही खासगी प्रवासी बस असल्याच्या माहितीला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
भीषण अपघातात सहा प्रवासी ठार :हिंगोलीच्या दिशेने जाणारी एम एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स बस अमरनाथ येथून तीर्थयात्रा करून परत येत होती. या ट्रॅव्हल्स बसमध्ये 35 ते 40 तीर्थयात्री होते. तर नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गाडी क्रमांक एम एच 27 बी एक्स 4466 या ट्रॅव्हल्स बसमध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. या दोन गाड्या मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहावर समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये समोरासमोर भिडल्याने दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 22 प्रवासी जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलडाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यावेळी रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
मृत भाविक हिंगोली जिल्ह्यातील :दोन ट्रॅव्हल्सने समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात 6 भाविक ठार झाले आहेत. या अपघातातील एक ट्रॅव्हल्स हिंगोली जिल्ह्यातील आहे. दहा तारखेला ही ट्रॅव्हल्स अंबरनाथ यात्रेला गेली होती. अमरनाथून परत येत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात हिंगोली जिल्ह्यातील 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात मृत झालेले भाविक :
- चालक संतोष जगताप ( वय 45 भांडेगाव हिंगोली )
- शिवाजी धनाजी जगताप ( वय 55 भांडेगाव, हिंगोली )
- राधाबाई सखाराम गाडे ( वय 50 जयपूर, हिंगोली )
- सचिन शिवाजी माघाडे ( वय 28 लोहगाव, हिंगोली )
- अर्चना घूकसे ( वय 30 लोहगाव हिंगोली )
- कान्होपात्रा टेकाळे ( वय 40 केसापूर, हिंगोली )
अमरनाथवरुन परत येत होते भाविक :हिंगोली येथील 35 ते 40 भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. हे भाविक हिंगोलीला आपल्या खासगी बसने परत जात होते. मात्र परत जाताना त्यांच्या खासगी बसला मलकापूरच्या जवळ मुंबई नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. त्यामुळे अमरनाथवरुन आलेल्या या भाविकांचा घटनास्थळावर प्रचंड आक्रोश दिसून आला.