गुलाबराव वाघ माहिती देताना बुलडाणा :लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील एका शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून शेतातील गांजाची रोपं जप्त केली. यावेळी अनिल चव्हाण यांच्या शेताततून जवळपास 14 क्विंटल गांजीची रोपं जप्त करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यावर गुन्हा दाखल : बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं छापा टाकला असता, चव्हाण यांच्या शेतात 300 ते 400 गांजाची रोपं आढळून आली. तुरीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी गांजाची रोपं उपटून पंचनामा केला. तसंच पोलिसांनी रोपं जप्त करत शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
1 कोटी 40 लाखांचा गांजा जप्त : जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या रोपांची किंमत 1 कोटी 40 लाख रुपये असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करत शेतकऱ्यावर मोठी कारवाई केली आहे.
लोणारमध्ये सर्वात मोठी कारवाई : लोणारमध्ये अमली पदार्थांविरोधात केलेली ही मोठी कारवाई आहे. अनिल चव्हाण या शेतकऱ्यानं माळरानावर तीन एकरात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काकडे, पोलीस हवालदार दीपक वायाळ यांनी याबाबत माहिती पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना दिली. त्यानंतर सापळा रचत कारवाई करण्यात आलीय. जप्त केलेली गांजाची 14 क्विंटल झाडं एका ट्रॅक्टरमधून लोणार पोलीस ठाण्यात आणण्यात आली. त्यानंतर 'एपीआय' सचिन कानडे यांच्या तक्रारीवरून लोणार पोलीस ठाण्यात 'एनडीपीएस' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे, नीलेश सोळंके, सचिन कानडे, शरद गिरी, दीपक लेकुरवाळे, राजकुमार राजपूत, दिनेश बकाले, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, गजानन दराडे, अमोल शेजोळ, वैभव मगर, मनोज खराडे, दीपक वायाळ, वनिता शिंगणे, शिवानंद मुंडे, विलास भोसले, लोणारचे पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, राजेंद्र घोगरे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी सहभागी होते.
हेही वाचा -
- महादेव अॅपचा मालक उप्पलला दुबईत पोलिसांनी घेतलं ताब्यात, मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला वेग येणार?
- हत्येच्या आरोपीनं कायद्याचा अभ्यास करून लढला स्वतःचा खटला, १२ वर्षांनंतर निर्दोष मुक्त!
- अंगडिया लूट प्रकरण; सहा आरोपींना अटक, पोलिसांनी केले 4 कोटी जप्त