बुलडाणा - प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1052 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1020 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 33 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 9 असे एकूण 42 जण पॉझिटिव्ह निघाले असल्याचा अहवाल आला आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 252 तर रॅपिड टेस्टमधील 758 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1020 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे
मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : विवरा 1, मेहकर शहर :1, लोणार शहर :1, लोणार तालुका : बिबी 1, बुलडाणा शहर : 19, बुलडाणा तालुका : शिरपुर 1, मोताळा शहर :1, नांदुरा शहर :1, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : पिंपळगाव चिलमखा 1, शेगाव शहर :3, शेगाव तालुका : मनसगाव 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 1, खामगाव शहर : 7, अशाप्रकारे जिल्ह्यात 42 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 2 रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 751646 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86996 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86996 आहे. आज रोजी 965 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 751646 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87779 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86996 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 107 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.