महाराष्ट्र

maharashtra

अमरावती : दर्यापूरच्या मोबाईल गॅलरीत चोरी करणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक

By

Published : Jan 21, 2021, 9:13 PM IST

दर्यापूर शहरातील दोन दुकानातून मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशच्या बैतूलमधून अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे.

two-arrested-from-madhya-pradesh-for-stealing-mobile-in-daryapur-in-amravati
अमरावती : दर्यापूरच्या मोबाईल गॅलरीत चोरी करणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक

अमरावती -दर्यापूर शहरातील गांधीनगर परिसरातील भाईजी मोबाईल गॅलरी व बस स्थानकासमोरील लक्ष्मी मोबाइल गॅलरी फोडून चोराने 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. ही घटना 17 जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनेतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने दर्यापूर पोलिसांच्या मदतीने मध्यप्रदेशच्या बैतूलमधून अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे.

सीसीटीव्हीत झाले होते कैद -

तीनही चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आल्यानंतर दर्यापूर व स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास सुरु केला. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना मध्यप्रदेशच्या बैतूलमधून अटक केली. आरोपींमध्ये राजा मावस्कर (30) रा. बोरगाव, मध्य प्रदेश आणि एका 14 वर्षीय अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या चोरीप्रकरणातील आरोपी अनिल काळमा धुर्वे (21) रा. मध्यप्रदेश हा फरार आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अमरावती येथील बालगृहात पाठविले आहे.

हेही वाचा - मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवीन समितीचा निव्वळ फार्स, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details