महाराष्ट्र

maharashtra

'उमेद'चे खासगीकरण थांबवा, महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By

Published : Oct 12, 2020, 3:13 PM IST

विविध मागण्यांसाठी उमेदमधील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्या
आंदोलनकर्त्या

अकोला- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहायता समूहाच्या महिलांच्या 'उमेद' या प्रकल्पाचे खासगीकरण करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आज (दि. 12 ऑक्टोबर) अकोल्यातील शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनानंतर महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली.

विविध मागण्यांसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन सभामंडपात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. अनेक महिला छत्री घेऊन उनात बसल्या होत्या. मात्र, यावेळी या आंदोलनामध्ये सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाला होता.

या आहेत प्रमुख मागण्या

  • एक वर्षांपासून प्रलंबित असलेले ग्रामसंघ स्तरावरील विविध निधी त्वरित वितरीत करण्यात यावे
  • उमेद अभियानामध्ये त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप नको, ज्या कर्मचाऱ्यांचे पुनरनियुक्ती करार संपले आहे, त्यांचे पुन्हा करार नूतनीकरण करावेत
  • 10 सप्टेंबर, 2020 चे उमेद कंत्राटी कर्मचाऱ्यांचे करार नूतनीकरण न देण्याची परिपत्रक रद्द करण्यात यावे
  • कोणत्याही गावस्तरावर कॅडरला काढण्यात येऊ नये
  • गावातील सर्व संस्था बळकटीकरणासाठी निधी वेळेवर मिळावा
  • सर्व कॅडरचे मानधन वेळेत देण्यात यावे
  • गावस्तरावर बचत भवनाची उभारणी करावी

हेही वाचा -अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details