महाराष्ट्र

maharashtra

Akola Police Destroy Drug : अकोल्यात अडीच हजार किलो भांग पोलिसांकडून नष्ट

By

Published : Jan 2, 2022, 12:16 PM IST

मागील दोन वर्षात पोलिसांनी कारवाई करत अडीच हजार शंभर किलो भांग जप्त ( Police Seized Drug ) केली होती. त्याची किंमत अंदाजे अडीच लाखाच्या आसपास होती. न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ते आता नष्ट करण्यात ( Akola Police Destroy Drug )आले आहे.

Akola Police Destroy Drug
Akola Police Destroy Drug

अकोला : गेल्या दोन वर्षात विविध केलेल्या कारवाईमधून जप्त करण्यात आलेली दोन हजार शंभर किलो भांग पोलिसांनी नष्ट ( Akola Police Destroy Drug ) केली. याची किंमत सुमारे अडीच लाख रुपयांच्या वरती होती. रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या परिसरात ही भांग नष्ट करण्यात आली.

मागील दोन वर्षात पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आणि स्थानिक गुन्हे शाखेने ही भांग जप्त ( Police Seized Drug )केली होती. या केलेल्या कारवाईत 2,100 किलो भांग ज्याची अंदाजे किंमत अडीच लाख रुपयांच्या वरती असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी हे अमली पदार्थ साठवून ठेवले होते. न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

पोत्यात साठवलेल्या भांगाची...

पोलिसांनी कारवाईनंतर जप्त केलेली भांग पोत्यात साठवून ठेवली होती. पण, जीर्ण झाल्याने त्याची भुकटी झाली होती. त्यामुळे बऱ्याचवेळा ती पोत्यातून हाताने आगीत टाकण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

हेही वाचा -Saamna Rokthok : भाजपच्या प्रवासाचा आलेख 2022 मध्ये खाली आलेला दिसेल

ABOUT THE AUTHOR

...view details