महाराष्ट्र

maharashtra

आईच्या विरहात जंगलातील झोपडीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत दोन चिमुकले बहीण-भाऊ

By

Published : Apr 12, 2021, 8:52 PM IST

अकोले तालुक्यातील परतनदरा वाडीच्या जंगलात दोन चिमुकली बहीण-भाऊ वडिलांसोबत राहतात. आई दोघांना सोडून गेली असून वडील ज्ञानदेव मजुरीला जात असल्याने दोन चिमुकली प्लास्टिकच्या झोपडीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तर पाहुया ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..

mother-misssing-two-little-sisters-and-brothers
mother-misssing-two-little-sisters-and-brothers

शिर्डी (अहमदनगर) -आई कुठे आहे ग तु..का सोडुन गेलीस आम्हाला या जंगलात.. ही कुठल्या चित्रपटाची कहानी नाही तर सत्य घटना आहे. अकोले तालुक्यातील परतनदरा वाडीच्या जंगलात नंदिनी सोनवणे (वय 7) व तिचा भाऊ सिद्धांत (वय 5) या दोघांना आई सोडून गेली असून वडील ज्ञानदेव मजुरीला जात असल्याने दोन चिमुकली प्लास्टिकच्या झोपडीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तर पाहुया ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..

या दोन चिमुकल्यांची आई तीन वर्षापूर्वी या बाळांना सोडून गेली. तिला एका व्यक्तीने फुस लावून आपल्या पती व मुलापासून तोडून अकोले तालुक्यातील ओतूर परिसरात नेले आहे. याबाबत पती ज्ञानदेवने अकोले पोलिसाना तक्रार देऊनही त्याला दाद दिली नाही. शेवटी आलिया भोगासी असावे सादर म्हणत त्याने कळंब येथील जंगलात जिथे चिट पाखरू नाही मात्र तरस, कोल्हे,बिबटे यांचा अधिवास असलेल्या ठिकाणावर त्याने एका साब्रीच्या जंगलात मध्यभागी झोपडी बांधून आपल्या दोन मुलासह राहत आहे.

आईच्या विरहात जंगलातील झोपडीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत दोन चिमुकले
ज्ञानदेव सकाळी उठल्यावर मजुरीच्या कामासाठी बाहेर गावी जातो तर त्याची दोन मुले झोपडीत रोज जीव मुठीत धरून जगतात. दोन भाकड जनावरे व कोंबड्यांची साथ करत नंदिनी व सिद्धांत झोपडीत बसून असतात आपला बाप कधी येईल याची वाट पाहून ते आपल्या झोपडीत झोपून जातात. नंदिनी दुसरीत शिकते मात्र कोरोना असल्याने शाळा बंद आहे. नाही तर दोन किलोमीटर पायी चालत तिला शाळेत जावे लागते. वडील ज्ञानदेव गवंडी काम करतात त्यांना सकाळी उठून भाकरी करुन देणे, सिद्धांतला अंघोळ घालून जेवण देणे जनावरांना चारा घालणे ही सर्व काम ती करते.आपल्या आईपासून पोरकी झालेले ही चिमुरडी मुले आईच्या वाटेकडे डोळे लावून आहेत. कळंब गावच्या उपसरपंच श्रीमती शकुंतला खरात यांनी डोळ्यात आसवे आणून या कुटुंबाची व्यथा आमच्या समोर मांडली. या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर व मुलांची आई अकोले पोलिसांनी शोधून आणली नाही तर महिलांचा मोर्चा अकोले पोलीस ठाण्यावर काढणार असल्याचे त्या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details