टोकियो -भारताची पॅरा अॅथलिट टेबल टेनिस खेलाडू भाविनाबेन पटेल हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तिने महिला एकेरीच्या क्लास-4 गटात अंतिम फेरी गाठली आहे. भाविनाबेन पटेलच्या या कामगिरीमुळे भारताचे एक पदक निश्चित झाले आहे.
भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या झांग मियाओ हिचा 3-2 ने पराभव केला. या सामन्यात भाविनाबेन पटेलने पहिला गेम 11-7 ने गमावला. त्यानंतर तिने दुसरा गेम 11-7 ने जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये दमदार कामगिरी करत हा गेम तिने 11-4 असा जिंकत सामन्यात आघाडी मिळवली. पण चौथ्या गेममध्ये चीनच्या झांग मियाओ हिने वापसी करत हा गेम 11-9 असा जिंकला. निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ केला. परंतु भाविनाबेन या गेममध्ये झांग मियाओवर वरचढ ठरली. तिने हा गेम 11-8 अशा जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात भाविनाबेन सुवर्ण पदकासाठी झुंजणार आहे. दरम्यान, शुक्रवारी भाविनाबेन पटेलने उपांत्यपूर्व फेरीत सार्बियाची खेळाडू बोरिस्लावा पेरिच रांकोविच हिचा 17 मिनिटात 11-5, 11-6, 11-7 असा सहज धुव्वा उडवला होता.
तिरंदाजीत राकेश कुमारचा विजय