महाराष्ट्र

maharashtra

Sania New Instagram Post : टेनिस स्टार सानियाची जड अंतःकरणाची इन्स्टावर पोस्ट; घटस्फोटाच्या चर्चांणा पुन्हा आले उधाण

By

Published : Nov 26, 2022, 1:44 PM IST

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पुन्हा चर्चेत ( Indian Tennis Star Sania Mirza is Again in Limelight ) आली आहे. तिने इंस्टाग्रामवर नवीन पोस्ट करीत लिहले आहे की तिचे हृदय आता जड झाले ( Sania New Instagram Post That Her Heart is Set ) आहे. या पोस्टनंतर पती शोएब मलिकसोबत घटस्फोटाच्या बातम्यांना आता हवा मिळाली आहे.

Sania New Instagram Post
टेनिस स्टार सानियाची जड अंतःकरणाची इन्स्टावर पोस्ट

नवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली ( Indian Tennis Star Sania Mirza is Again in Limelight ) आहे. तिने नवीन इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे की, तिचे हृदय जड झालेले ( Sania New Instagram Post That Her Heart is Set ) आहे. या पोस्टनंतर पती शोएब मलिकसोबत घटस्फोटाच्या बातम्यांना हवा मिळाली आहे. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पाकिस्तानी पती शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, सानियाने इंस्टाग्रामवर आणखी एक विचित्र पोस्ट टाकली आहे, ज्यावरून ती घटस्फोट घेणार असल्याचे समजते आहे.

घटस्फोटाबाबत कोणतेही विधान समोर न आल्याने चित्र अजून अस्पष्ट :घटस्फोटाबाबत कोणतेही विधान समोर न आल्याने चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सानिया आणि शोएब यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. दोघेही वेगळे राहतात. सानियाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती, तिने नंतर ती पोस्ट डिलीट केली. ही पोस्ट वाचल्यानंतर तिचा पतीपासून घटस्फोट झाल्याचे समजते. घटस्फोटाच्या वृत्ताला तूर्तास दुजोरा मिळालेला नाही, असा अंदाज त्याच्या भावनिक पोस्टवरून वर्तवला जात आहे.

सानियाने इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट :सानियाने लिहिले आहे की, तुम्ही प्रकाश आणि अंधाराने बनलेले मनुष्य आहात. जेव्हा तुमचे हृदय जड असते किंवा असे काहीतरी वाटत असते, तेव्हा तुम्ही स्वतःकरिता वेळ द्यायला हवा ज्याकरिता एक ब्रेक घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कधी अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करायला शिकणे खूप महत्वाचे आहे. या भावनांवरून सानिया-शोएबच्या नात्यात खळबळ उडाली आहे. सानिया-शोएबचे 2010 मध्ये लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा इझान मिर्झा मलिक आहे. सानिया आणि शोएबच्या अधिकृत वक्तव्यानंतरच घटस्फोटाचे सत्य बाहेर येईल.

TAGGED:

Sania Mirza

ABOUT THE AUTHOR

...view details