महाराष्ट्र

maharashtra

Hockey World Cup 2023 : स्पेनने नवोदित वेल्सचा 5-1 असा पराभव केला

By

Published : Jan 15, 2023, 10:52 PM IST

ड गटात स्पेनच्या नावावर एक विजय आणि पराभवासह तीन गुण आहेत. इंग्लंड आणि स्पेनकडून झालेल्या दोन मोठ्या पराभवानंतर वेल्सचा संघ तळाशी आहे. त्यांचे शून्य गुण आहेत.

Spain vs wales
स्पेन विरुद्ध वेल्स

राउरकेला (ओडिशा) : दोन वेळच्या उपविजेत्या स्पेनने त्यांच्या हॉकी विश्वचषक मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली. रेने मार्क आणि मिरालेस मार्क यांच्या दुहेरी गोलने त्यांनी त्यांच्या पूल डी सामन्यात असहाय्य नवोदित वेल्स संघाचा 5-1 असा पराभव केला. रविवारी राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम वर हा सामना खेळवला गेला.

पहिल्या क्वार्टरमध्ये गोलशून्य बरोबरी : पहिल्या क्वार्टरमध्ये वेल्सने डावीकडून गोलवर हल्ला चढवला. स्पेनने वेल्सच्या वर्तुळावर अनेक आक्रमण करू केले आणि चेंडूवर अधिक ताबा मिळवला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. दोन्ही संघांनी त्यांना मिळालेल्या संधी गमावल्या. पहिल्या क्वार्टरच्या शेवटी स्कोअरलाइन 0-0 अशी होती.

हेही वाचा :Virat Kohli Record : श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकताच विराटने मोडला सचिनचा हा विक्रम, जयवर्धनेलाही मागे टाकले

रेयने मार्कने केला पहिला गोल : 16व्या मिनिटाला रेयने मार्कने केलेल्या गोलने स्पेनला आघाडी मिळवून दिली. त्याने टोबी रेनॉल्ड्स-कॉटरिलच्या पायांमधून चेंडू काढत नेटच्या तळाशी त्याला टोलवला. 22 व्या मिनिटाला स्पेनची आघाडी दुप्पट झाली. जेरार्ड क्लॅप्सने एक प्रभावी धाव पूर्ण केली, चेंडू कर्णधार इग्लेसियास अल्वारोकडे नेला, ज्याने गोल करण्यात वेळ वाया घालवला नाही.

स्पेनचा उत्तम बचाव : दुसऱ्या क्वार्टर मध्ये टॅकलनंतर स्पेनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, पण तो हुकला. हाफ टाईमची स्कोअरलाइन 2-0 अशी होती. तिसऱ्या क्वार्टरमध्ये वेल्सचा कर्णधार ल्यूक हॉकरने गोल करण्याचा प्रयत्न केला पण स्पेनच्या रफी अॅड्रानने त्याचा प्रयत्न हाणून पाडला. वेल्सलाही एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, पण स्पेनने उत्तम सेव्ह करत तोही प्रयत्न रोखला.

वेल्सने शेवटच्या क्वार्टरमध्ये केला एक गोल :32व्या मिनिटाला मिरॅलेस मार्कने पेनल्टी कॉर्नरला गोल करून आघाडी तिप्पट केली. सहा मिनिटांनंतर रेयने मार्कने दुसरा गोल करून स्पेनची आघाडी 4-0 अशी केली. तिसरा क्वार्टर संपला आणि स्पेनने 4-0 अशी आघाडी घेतली. शेवटच्या क्वार्टरमध्ये 52 व्या मिनिटाला कार्सन जेम्सने वेल्सला गोल करून संघाचे खाते उघडले. पण मिरॅलेसने दुसरा गोल करत स्कोअरलाइन 5-1 अशी केली.

हेही वाचा :India Vs Sri Lanka : भारताने नोंदवला वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय! श्रीलंकेचा तब्बल 317 धावांनी पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details