मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील बारावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad ) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. त्या अगोदर दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
आयपीएलच्या इतिहासात या दोन संघात प्रथमच सामना होत आहे. कारण लखनौ सुपरजायंट्स यंदाच्या हंगामात नव्याने सहभागी झाला आहे. आजच्या सामन्यासाठी लखनौ सुपरजायंट्स संघात एक बदल करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे जेसन होल्डर आज लखनौ सुपर जायंट्सकडून पदार्पण करणार आहे. त्याला पदार्पणाची कॅप मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर ( Head Coach Andy Flower ) यांनी दिली. सनरायझर्स हैदराबाद संघात आज कोणताही बदल करण्यात आला नाही.