लंदन:स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सची इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB ) गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. स्टोक्स फलंदाज जो रूटची ( Joe Root ) जागा घेईल, ज्याने या वर्षी एप्रिलमध्ये कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा 81 वा कर्णधार ठरला आहे.
31 वर्षीय रूटनंतर स्टोक्सची कर्णधारपदी नियुक्ती ( Ben Stokes appointed captain ) अपेक्षित होती. मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावल्यानंतर रूटने कर्णधारपद सोडले. कसोटी कर्णधार म्हणून स्टोक्सची पहिली कसोटी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेतील असणार. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला 2 जूनपासून लॉर्ड्सवर सुरू होणार आहे.
स्टोक्स म्हणाला, इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने माझा सन्मान आहे. हा खरा विशेषाधिकार आहे आणि नवीन इनिंग सुरू करण्यासाठी मी उत्साहित आहे. जो रूटने इंग्लिश क्रिकेटमध्ये केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल मला आभार मानायचे आहेत. तो एक लीडक म्हणून ड्रेसिंग रूमचा एक मोठा भाग आहे आणि या भूमिकेत तो माझ्यासाठी महत्त्वाचा सहयोगी राहील.