मुंबई - अभिनेता अभय देओलने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधलाय. फिल्म इंडस्ट्रीत असलेल्या भ्रष्टाचारावर एक माणूस सिनेमाही बनवू शकतो, असे त्याने म्हटलंय. अभयने आपले विचार इन्स्टाग्रमवर पोस्ट लिहून शेअर केले आहेत. यात त्याने २०१२ मध्ये आलेल्या आणि समिक्षकांनी वाखाणलेल्या शंघाई चित्रपटाचा उल्लेख केलाय.
राजकारणातील भ्रष्टारावर आधारीत हा सिनेमा होता. त्याने लिहिलंय, ''शंघाई २०१२ मध्ये रिलीज झाला होता. वसिलिस वसिलिकोस यांनी लिहिलेल्या ग्रीक कादंबरीवर आधारित भारतीय विचार यात मांडण्यात आले होते. दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा राजकारणातील भ्रष्टाचाराभोवती गुंफण्यात आली आहे. आजच्या काळात हा सिनेमा खूप उपयुक्त आहे, असं वाटतं की बॉलिवूडमधील भ्रष्टारावरही कोणीतरी सिनेमा बनू शकते.''