महाराष्ट्र

maharashtra

ट्विंकल अन् अक्षयचं 'असे' आहे वैवाहिक आयुष्य, लग्नाच्या १९ वर्षानंतर अक्षयने केला उलगडा

By

Published : Jan 17, 2020, 7:05 PM IST

अक्षयने ट्विंकलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत अक्षयचा '२.०' चित्रपटातील राक्षसी लुक पाहायला मिळतो.

Akshay Kumar adds quirky touch to anniversary wish for Twinkle
ट्विंकल आणि अक्षयचं अशाप्रकारचं आहे वैवाहिक आयुष्य, लग्नाच्या १९ वर्षानंतर अक्षयने केला उलगडा

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे एक पॉवर कपल मानलं जातं. त्यांच्या लग्नाला आज १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. अक्षयने ट्विंकलसोबत १७ जानेवारी २००१ साली लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अक्षयने ट्विंकलला आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षयने ट्विंकलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत अक्षयचा '२.०' चित्रपटातील राक्षसी लुक पाहायला मिळतो. या फोटोपेक्षा अक्षयने यावर दिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा -'थलायवी': एमजीआर यांच्या भूमिकेतील अरविंद स्वामींची पहिली झलक

त्याने लिहिलेय, की 'वैवाहिक आयुष्य कशाप्रकारे असते, याची झलक असलेला हा फोटो. काही दिवस तुम्हाला एकमेकांवर प्रेम करायचे असते. तर काही दिवस अशाप्रकारे एकमेकांना भीती दाखवायची असते. सर्व काही सांगितलं आहे. यापेक्षा अधिक माझ्याकडे काहीही नाही. पक्षीराजन कडून खूप प्रेम', असे लिहून अक्षयने ट्विंकलला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -सारा-कार्तिकच्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित, चाहते मात्र संभ्रमात

ABOUT THE AUTHOR

...view details