महाराष्ट्र

maharashtra

Actor Naga Chaitanya : सामंथासोबतच्या घटस्फोटावर नागा चैतन्यने सोडले मौन: म्हणाला मीही खूश, तीही खूश

By

Published : Jan 13, 2022, 4:27 PM IST

अभिनेता नागा चैतन्यने पहिल्यांदाच त्याच्या आणि सामंथाच्या घटस्फोटावर ( Naga Chaitanya's reaction to divorce ) आता मौन सोडले आहे. त्याने आपल्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

NAGA CHAITANYA
NAGA CHAITANYA

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने ( Actor Naga Chaitanya ) गेल्या वर्षी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर नागा चैतन्यने आता पहिल्यांदाच आपले मौन सोडले आहे. या जोडप्याने 2021 मध्ये आपण विभक्त झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर या जोडप्याच्या घटस्फोटाची अनेक कारणे समोर आली होती. तसेच या जोडप्याच्या चाहत्यांना या बातमीने धक्का बसला होता. आता नागा चैतन्य सामंथासोबतच्या घटस्फोटावर (Divorce of Naga Chaitanya and Samantha ) उघडपणे बोलला आहे.

खरं तर, आजकाल नागा त्याच्या 'बंगाराजू' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ( Promotion of 'Bangaraju' movie ) व्यस्त आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या घटस्फोटाबद्दल उघडपणे बोलला आहे. नागा चैतन्य म्हणाला, 'वेगळं होणं ठीक आहे. हे आमच्या स्वतःच्या आणि आप-आपल्या आनंदासाठी ते योग्य आहे. जर ती आनंदी असेल तर मीही आनंदी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत घटस्फोट घेणे हा योग्य निर्णय आहे'.

तत्पूर्वी, सामंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu ) घटस्फोटावर ईटाइम्सला उघडपणे सांगितले होते, की 'मला असे वाटते की मी याबद्दल खूप बोललेली आहे, याबद्दल जे बोलणे आवश्यक होते, ते मी बोलले देखील, परंतु आता मला वाटत नाही की त्याची पुन्हा-पुन्हा पुनरावृत्ती करावी.

गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी या जोडप्याने आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे या जोडप्याने 29 जानेवारी 2017 रोजी हैदराबादमध्ये एंगेजमेंट केली होती. 6 ऑक्टोबर 2017 रोजी गोव्यात शाही विवाह सुद्धा पार पडला होता. त्यानंतर दोघांचे लग्न केवळ 4 वर्षे टिकू शकले.

सामंथाबद्दल बोलायचे झाले तर घटस्फोटानंतर ती वेगळे आयुष्य जगत आहे. ती तिच्या मैत्रिणींसोबत उत्तर भारतातील काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठीही गेली होती आणि दररोज ती सोशल मीडियावर तिच्या बोल्ड स्टाइलसाठी चर्चेत देखील आहे.

हेही वाचा :Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'चा ट्रेलर सर्व प्लॅटफोर्मवरून हटवला

ABOUT THE AUTHOR

...view details