महाराष्ट्र

maharashtra

अनुपम खेर यांनी सुरू केले विद्युत जामवालसोबत 'आयबी 71' चे शुटिंग

By

Published : Mar 22, 2022, 2:38 PM IST

'द कश्मीर फाइल्स'नंतर आता अनुपम खेर यांनी ापल्या आगामी चित्रपटाचे शुटिंग सुरू केले आहे. विद्युत आणि अनुपम खेर यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनुपम खेर आणि विद्युत जामवाल
अनुपम खेर आणि विद्युत जामवाल

मुंबई -'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने देशभरात खळबळ माजवल्यानंतर अभिनेता अनुपम खेर आता एका नव्या चित्रपटात दिसणार आहेत. 'आयबी 71' असे या चित्रपटाचे नाव असून यात अभिनेता विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला या वर्षी जानेवारीमध्ये सुरुवात झाली होती. आता अनुपम खेर यांनी चित्रपटाच्या सेटवर प्रवेश केला आहे. विद्युत आणि अनुपम खेर यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनुपम खेर

अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या सेटवरून विद्युत जामवालसोबतचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले, 'आणि मी माझ्या आगामी चित्रपटाचे शूटिंग अत्यंत प्रतिभावान आणि नम्र विद्युत जामवालसोबत सुरू केले आहे. द गाझी अटॅक फेम दिग्दर्शक संकल्प रेड्डी या शानदार थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करत आहेत, जय हो और जय हिंद"

अनुपम खेर आणि विद्युत जामवाल

फोटोमध्ये आयबीचे कार्यालय दिसत आहे. अनुपम आणि विद्युत दोघेही त्यांच्या व्यक्तीरेखेच्या वेशभूषामध्ये दिसत आहेत. अनुपमची व्यक्तिरेखा पाहून या चित्रपटात ते एका मोठ्या आयबी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे दिसते.

विद्युत जामवाल राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते संकल्प रेड्डीसोबत त्याचा पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट 'IB 71' घेऊन येत आहे. विद्युत जामवालने या वर्षी जानेवारीमध्ये मुंबईत चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्यूल सुरू केले होते. या चित्रपटातून विद्युतही निर्माता म्हणून नवी सुरुवात करत आहे.

अनुपम खेर आणि विद्युत जामवाल

'IB 71' या अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटात विद्युत एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्‍यांनी चतुराईने संपूर्ण पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला कसे चकमा दिले हे चित्रपटात दाखवले जाईल.

अनुपम खेर आणि विद्युत जामवाल

अनुपम खेर यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या यशानंतर आता या चित्रपटात ते आपला दमदार अभिनय करताना दिसणार आहेत. 'द कश्मीर फाइल्स'च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने 10 दिवसांत 150 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि अजूनही चित्रपटगृहांमध्ये आघाडीवर आहे.

हेही वाचा -होळी खेळून परतताना तेलुगू अभिनेत्री गायत्रीचा कार अपघातात मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details