महाराष्ट्र

maharashtra

रिप्ड जीन्स विधानावर नव्या नवेलीची प्रतिक्रिया, म्हणाली...'आधी मानसिकता बदला'

By

Published : Mar 18, 2021, 2:18 PM IST

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना रिप्ड जीन्स विधानावर बॉलिवूडचे मेगास्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने प्रतिक्रिया दिली. महिलांचे कपडे बदलण्याऐवजी तुम्ही आपली मानसिकता बदलावी, असे ती म्हणाली.

नव्या नवेली-तीरथ सिंह रावत
नव्या नवेली-तीरथ सिंह रावत

मुंबई -बॉलिवूडचे मेगास्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना रिप्ड जीन्स विधानावरून मानसिकता बदलण्याचा सल्ला तीने दिलाय. तीरथ सिंह रावत यांनी रिप्ड (फाटलेली) जीन्स घालणाऱ्या महिला मुलांना काय संस्कार देतील, असे वादग्रस्त विधान केले होते.

रिप्ड जीन्स विधानावर नव्या नवेलीची प्रतिक्रिया

महिलांचे कपडे बदलण्याऐवजी तुम्ही आपली मानसिकता बदलावी. समाजाला कसला संदेश दिला जात आहे, ही गोष्ट गंभीर आहे. मी माझी रिप्ड जीन्स गर्वाने घालेन, असे नव्या नवेलीने म्हटलं आहे. तसेच तीने रिप्ड जीन्स घातलेला एक फोटोही शेअर केला आहे.

काय प्रकरण?

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगवान रामशी तुलना केल्यानंतर आता महिलांनी जीन्स घालण्याबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे कसले संस्कार आहेत? या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देतील, विधान त्यांनी केले. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुले-मुली फाटलेली जीन्स घालतात. या प्रकारचे वातावरण योग्य नाही. हे ब्रिटिशांचे अनुसरन करत आहेत. आपल्या मुलांना चांगला संस्कार द्या, ज्या मुलाला संस्कार आहे. तो कधीही अपयशी ठरू शकत नाही, असे ते म्हणाले. त्यांचे विधान वादात पडताना दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेही वाचा -महिला फाटक्या जीन्स घालतात, मुलांना काय संस्कार देणार, भाजपाच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

ABOUT THE AUTHOR

...view details