महाराष्ट्र

maharashtra

फिल्म अवॉर्ड्सवर अभय देओलने साधला निशाणा

By

Published : Jun 20, 2020, 7:55 PM IST

'जिंदगी ना मिलो दोबारा' या चित्रपटासाठी अवॉर्ड शोमध्ये त्याला सपोर्टिंग कॅटॅगिरीसाठी कसे नामांकित करण्यात येत होते याबद्दलचा खुलासा अभिनेता अभय देओलने केला आहे. व्यक्तींच्या विरोधात कशा प्रकारे फिल्म इंडस्ट्रीमध्ये लॉबिंग केले जाते याबद्दल सांगितले आहे.

Abhay Deol react on bollywood nepotism
फिल्म अवॉर्ड्सवर अक्षय देओलने साधला निशाणा

मुंबई - सुशांतसिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझ्म आणि पॉवर पॉलिटीक्स यावर वाद निर्माण झाला आहे. अभयची ही पोस्टदेखील त्यानंतरच आली आहे. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या 'जिंदगी ना मिले दोबारा' सिनेमात अभयने ह्रतिक रोशन आणि फरहान अख्तरसोबत काम केले होते. सिनेमात कॅटरिना आणि कल्कि कोयचलिन यांच्याही भूमिका होत्या.

अभय देओलने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय की, 'फक्त ह्रतिक रोशनला बेस्ट अॅक्टरच्या कॅटॅगिरीमध्ये नामांकन मिळायचे आणि फरहान आणि त्याला सपोर्टिंग अॅक्टरसाठी मिळायचे.'

हेही वाचा - सलमानचे 'बिइंग ह्यूमन' म्हणजे फक्त देखावा - अभिनव कश्यप

त्यानं लिहिलंय, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपट २०११ मध्ये रिलीज झाला होता. आजकाल रोज या शीर्षकाचा जप करीत स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न होतो. तुम्ही जेव्हा चिंता किंवा तणावमध्ये असता तेव्हा पाहण्यासाठी हा चांगला चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल मी सांगेन की, जवळपास सर्व चित्रपट महोत्सवामध्ये मला आणि फरहानला मुख्य अभिनेत्यासाठी नव्हे तर केवळ सहाय्यक अभिनेतासाठी नामांकन मिळायचे.

देओलने पुढे सांगितले, ''ह्रतिक आणि कॅटरिनाला मुख्य रोलसाठी नामांकन मिळायचे. इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक पध्दती आहेत ज्यातून तुमच्या विरोधात लॉबी काम करीत असते. याबाबतीत पूर्ण बेशरमपणे हे काम खुल्लमखुल्ला केले जाते. बेशक मी अवॉर्ड बायकॉट केले होते, परंतु फरहानला याचा काही त्रास नव्हता.

हेही वाचा - अंकितापासून वेगळं होण्याचा सुशांतला पश्चाताप, मानसोपचार तज्ज्ञांचा खुलासा

अभय देओलने आपली पोस्ट 'फॅमिली फेयरअवॉर्ड्स' या हॅशटॅगने संपवली आहे. यातून लक्षात येते की त्याने फिल्म फेयर अवॉर्ड्सवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय. याचा संबंध सध्या सुरू असलेल्या नेपोटिझ्म आणि स्टार पॉवरशी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details