महाराष्ट्र

maharashtra

Vicky kaushal : 'या' कारणासाठी विक्की कौशलने रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मधून घेतला माघार...

By

Published : Jul 25, 2023, 6:19 PM IST

बॉलीवूड स्टार विक्की कौशलने रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाला नाकारले आहे. या चित्रपटाऐवजी त्याने 'छावा' नावाच्या चित्रपटाची निवड केल्याचे समजत आहे.

Vicky kausha
विक्की कौशल

मुंबई :बॉलीवूड स्टार विक्की कौशलचा मागील चित्रपट 'जरा हटके जरा बचके' बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटींची कमाई केली होती. सारा आणि विक्कीच्या जोडीला प्रेक्षकांद्वारे खूप पसंत केले गेले होते. दरम्यान आता विक्की कौशल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. विक्की कौशलबद्दल असे बोलले जात आहे की त्याने बॉलीवूडमधील टॉप अ‍ॅक्शन चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ला नाकारले आहे. 'जरा हटके जरा बचके'च्या यशानंतर विक्की कौशलला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. या चित्रपटात विक्की हा अजय देवगणच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत दिसणार होता. आता विक्की कौशल हा 'सिंघम अगेन' चित्रपटात झळकणार नाही अशा बातम्या समोर येत आहे. दरम्यान आता यासंबंधित रोहित शेट्टीचे एक खुलासा केला आहे.

'सिंघम अगेन' पुन्हा सोडण्याचे कारण काय? :विक्की कौशलला 'छावा' नावाचा चित्रपट ऑफर झाला आहे. त्यानंतर 'सिंघम अगेन' आणि 'छावा' चे शेड्यूल जुळत नसल्यामुळे विक्कीने 'सिंघम अगेन' ऐवजी 'छावा' ची निवड केल्याचे समजत आहे. या शेड्यूलनुसार रोहित शेट्टीला अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि विक्की कौशलसोबत अ‍ॅक्शन सीन चित्रित करायचा होता, पण आता तसे होणार नाही, असेही बोलले जात आहे. या चित्रपटामधील काही सीन येत्या ऑक्टोबरमध्ये शूट केले जाणार आहे आणि त्यासाठी विक्की कौशल वगळता सगळ्यांनी आपले शेड्युल या चित्रपटासाठी लॉक केले आहे.

रश्मिका मंदान्ना विक्की कौशलसोबत दिसणार :दरम्यान आता या बातमीवर रोहित शेट्टी पिक्चर्सकडून एक विधान समोर आले आहे, ज्यामध्ये या बातमीचे खंडन करण्यात आले आहे. त्यानंतर आता या चित्रपटाबाबतीत 'रोहित शेट्टीचे अधिकृत विधान समोर आले आहे, 'रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनच्या स्टारकास्टबद्दल बोलताना त्याने सांगितले की, सध्या चित्रपट प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे, आम्ही तुम्हाला विनंती करतो की अशा बातम्या चालवू नका, आम्ही लवकरच चित्रपटाबद्दल घोषणा करू. असे त्याने विधानात सांगितले आहे. दरम्यान पहिल्यांदाच साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही विक्की कौशलसोबत 'छावा' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details