महाराष्ट्र

maharashtra

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित 'या' अभिनेत्रीसाठी बनली ‘बॅाडी डबल’,

By

Published : Dec 7, 2022, 2:11 PM IST

साहसदृश्ये अथवा काही कारणास्तव कलाकारांसाठी बऱ्याचदा बॅाडी डबलचा वापर केला जातो. अशाच बॅाडी डबलचा उपयोग जयंत पवार (Jayant Pawar) दिग्दर्शित ‘अथांग’मध्येही (Athang Movie) करण्यात आला आहे. मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. या वेळी एक सुपरस्टार अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीची बॅाडी डबल बनली आहे आणि ही अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit).

Tejaswini Pandit
तेजस्विनी पंडित

मुंबई : ‘अथांग’मध्ये (Athang Movie) तेजस्विनीने केतकी नारायणसाठी (Ketaki Narayan) बॅाडी डबल म्हणून काम केले आहे. प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजची तेजस्विनी (Tejaswini Pandit) निर्माती आहे. पडद्यावर जरी तेजस्विनी प्रत्यक्ष झळकली नसली तरी पडद्यामागे मात्र तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. या वेबसीरिजमधील काही दृश्यांना तिचा आवाजही लाभला आहे.



कागदावर श्रीगणेशा लिहिण्याच्या प्रक्रियेपासून : याबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, एक कलाकार म्हणून वावरताना आपल्यावर फार जबाबदारी नसते. शुटिंग, डबिंग करायचे की आपले काम झाले. परंतु निर्माती म्हणून वावरताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या (Being a producer comes with many responsibilities) लागतात. कागदावर श्रीगणेशा लिहिण्याच्या प्रक्रियेपासून मी यात सहभागी होते आणि मी हे काम एन्जॅायही केले. अनेकांनी मला विचारले यात तू एखादी भूमिका का नाही केलीस, तर निर्माती म्हणून या भूमिकेला मला शंभर टक्के न्याय द्यायचा होता आणि अभिनय करून मला हे शक्य झाले नसते. मुळात यात मी पडद्यावर जरी दिसत नसले तरी पडद्यामागे मी अनेक भूमिका पार पाडल्या (I have played many roles behind the scenes) आहेत. यात काही ठिकाणी मी आवाजही दिला आहे. त्यामुळे विविध भागांत मी काम केले आहे.


प्रमुख भूमिका : प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर (Santosh Kher) निर्माते आहेत. यात संदीप खरे (Sandeep Khare), निवेदिता जोशी- सराफ (Nivedita Joshi- Saraf), धैर्य घोलप (Dhairya Gholap), भाग्यश्री मिलिंद (Bhagyashree Milind), उर्मिला कोठारे (Urmila Kothare), ऋतुजा बागवे Rutuja Bagve, दीपक कदम (Deepak Kadam), ओमप्रकाश शिंदे (Omprakash Shinde), केतकी नारायण (Ketaki Narayan), शशांक शेंडे (Shashank shende), योगिनी चौक (Yogini Chouk) आणि रसिका वखारकर (Rasika Vakharkar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘अथांग’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Planet Marathi OTT) उपलब्ध आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details