मुंबई :अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल विवाहबंधनात अडकणार आहे. करण आणि द्रिशा आचार्य यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सोमवार पासून सुरुवात झाली. करण आणि द्रिशाचा मेहंदी सोहळा १५ जूनला पार पडला. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मेंहदीचा कार्यक्रम हा सनीच्या निवासस्थानी झाला असून या कार्यक्रमात करणने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सनी हा गेटवर सर्वांचे अभिवादन करताना दिसला. त्याने मुलाच्या लग्नासाठी त्यांच्या हातावर मेंहदी काढल्याचे दिसत आहे. त्याने मेहंदी काढलेला हात देखील यावेळी दाखविला आहे. सनीच्या हातावर अनेक धार्मिक चिन्हे काढलेली दिसत आहे. पीच शर्ट आणि पांढर्या पँटमध्ये सनी फार सुंदर दिसत आहे.
सनी देओलच्या मुलाचे लग्न : दरम्यान यावेळी करण देखील पिवळा कुर्त्यामध्ये कारमध्ये हसताना दिसला आणि त्याने देखील पापाराझीला पोझ दिली. करणच्या हातावर द्रिशाचे नाव लिहले दिसत आहे. सोमवारी रात्री रोका समारंभाने लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सध्याला या लग्नाचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत. 2018 मध्ये आलेल्या 'बधाई हो' या चित्रपटातील 'मोरनी बनके' या गाण्यावर नाचताना सनी देओलचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर सध्याला व्हायरल झाला आहे. सनी, बॉबीचा चुलत भाऊ अभय देओल हा देखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याने देखील यावेळी पापाराझीला पोझ देवून फोटो काढले आहे.