अबू धाबी - आयफा पुरस्कार सोहळा 2022 मधील गुरुवारची रात्र खास होती. सर्वोत्कृष्ट संगीत प्रतिभांचा समावेश असलेल्या स्टार -स्पॅन्गल कॉन्सर्ट आणि फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनी क्युरेट केलेली फॅशन परेड, यासह नऊ तांत्रिक पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.
अपारशक्ती खुरानासोबत फराह खानने होस्ट केलेल्या या मैफिलीमध्ये 'पुष्पा: द राइज' आणि 'KGF 2' या चित्रपटांचा संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) चा डजबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यानंतर गुरू रंधावा, हनी सिंग, तनिष्क बागची, नेहा कक्कर, असीस कौर, अॅश किंग आणि जहरा एस खान यांच्या व्हर्च्युओसो परफॉर्मन्सचा समावेश होता. फॅशन शोमध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि अनन्या पांडे रॅम्पवर चमकताना दिसले, अगदी आयफा अवॉर्ड्स रात्रीचा होस्ट सलमान खान, प्रेक्षकांमध्ये सारा अली खान आणि ध्वनी भानुशालीसोबत मस्ती करत होता.
संध्याकाळच्या बहुप्रतीक्षित सत्राचा सर्वोच्च बिंदू म्हणजे नऊ तांत्रिक पुरस्कारांची घोषणा. त्यापैकी तीन पुरस्कार शूजित सरकारच्या 'सरदार उधम' (सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी, अविक मुखोपाध्याय; एडिटींगसाठी , चंद्रशेखर प्रजापती; आणि VFX साठीचे पुरस्कार ) या चित्रपटाला मिळाले.
आनंद एल. राय यांच्या 'अतरंगी रे' चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले ('चका चक' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन, विजय गांगुली; आणि पार्श्वसंगीत, ए.आर. रहमान यांना हे पुरस्कार जाहीर झाले.
विष्णुवर्धनच्या सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'शेरशाह' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार (संदीप श्रीवास्तव), अनुभव सिन्हा यांच्या 'थप्पड'ला सर्वोत्कृष्ट संवादासाठी (अनुभव सिन्हा आणि मृण्मयी लागू), तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या अजय देवगण आणि सैफ अली खानच्या चित्रपटाला साउंड डिझाईनसाठी (लोचन कानविंदे) आणि कबीर खानच्या वर्ल्ड कप क्रिकेट ड्रामा, '८३' या चित्रपटाच्या साउंड मिक्सिंगसाठी (अजय कुमार पीबी आणि माणिक बत्रा) यांना पुरस्कार मिळाले.
कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) साथीच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्यांसाठी अनिवार्य RTPCR अहवाल आणि स्थळाच्या प्रवेशद्वारावर फेस मास्कची आवश्यकता होती. शनिवारी मुख्य अवॉर्ड सायंकाळचे आयोजन केले जाईल, ज्यात सलमान, रितेश देशमुख आणि मनीष पॉल होस्ट म्हणून असतील. सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग अबू धाबी (डीसीटी अबू धाबी) आणि मिरल यांच्या सहकार्याने आयफा पुरस्कार आयोजित केले जात आहे.
हेही वाचा -पंकज त्रिपाठीच्या 'शेरदिल: द पिलीभीत सागा'चा ट्रेलर लॉन्च